Home /News /mumbai /

मुंबईत शरजील इमाम समर्थनार्थ केली घोषणाबाजी, उर्वशी चूडावालासह 50 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

मुंबईत शरजील इमाम समर्थनार्थ केली घोषणाबाजी, उर्वशी चूडावालासह 50 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

मुंबई पोलिसांच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आरोपींची कसून चौकशी केली जाणार आहे. उर्वशी चूडावालाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरदेखील तपास सुरू आहे.

  मुंबई, 04 फेब्रुवारी : मुंबईमध्ये शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आझाद मैदानात पोलिसांनी तब्बल 50 ते 60 देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एक नाव उर्वशी चूडावालचं देखील आहे जीच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत ती एमए (मीडिया)ची विद्यार्थिनी आहे. चुडावाला TISS Queer Collective या लैंगिक भेदभाव विरोधात काम करणाऱ्या संस्थेतदेखील सहभागी आहे. मुंबई पोलिसांच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आरोपींची कसून चौकशी केली जाणार आहे. उर्वशी चूडावालाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरदेखील तपास सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चूडावालाला चौकशीसाठी 2 वेळा बोलावण्यात आलं पण ती हजर राहिली नाही. आरोपींवर कलम 124ए(देशद्रोह), 153बी(राष्ट्रीय अखंडतेचा पूर्वग्रह) आणि 505(सार्वजनिक गैरवर्तन विधान) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? शनिवारी LGBTQ परेडमध्ये शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणार्‍यांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. क्विर आझादी चळवळीच्या (QAM) संयोजकांनी पोलिसांना सांगितले की, गटातील लोक अशा घोषणा देतील याबद्दल आम्हाला माहित नव्हते. आयोजकांचे जबाब नोंदवल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. QAM आयोजित संस्थाने केला निषेध घोषणाबाजी करणारा वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्यानंतर क्यूएएमच्या आयोजन समितीने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे- 'आम्ही यापासून स्वत: ला पूर्णपणे वेगळे करतो आणि कडक शब्दांत कट्टर घोषणाबाजी करणाऱ्यांचा निषेध करतो. कार्यक्रमाच्या वेळी भारताच्या अखंडतेविरूद्ध केलेल्या कोणत्याही निषेधाचा आम्ही निषेध करतो.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Renuka Dhaybar
  First published:

  Tags: Devendra Fadnavis, Maharashtra, Sharjeel Imam

  पुढील बातम्या