Home /News /mumbai /

Mohit Kamboj: कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Mohit Kamboj: कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध कर्ज बुडवल्याप्रकरणी FIR दाखल

भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध कर्ज बुडवल्याप्रकरणी FIR दाखल

Mohit Kamboj Bhartiya: भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

    मुंबई, 1 जून : भाजपचे नेते (BJP leader) मोहित कंबोज भारतीय (Mohit Kamboj Bhartiya) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित कंबोज यांच्यासह त्यांच्या कंपनीतील दोन संचालकांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित कंबोज यांनी बँकेकडून 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या बँकेची फसवणूक करत कर्ज बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. बँकेकडून कर्ज घेतले होते पण कर्जाची ही रक्कम ज्यासाठी घेतली होती त्या कामासाठी न वापरता इतरत्र वापरल्याचा मोहित कंबोज यांच्यावर आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहित कंबोज हा गुन्हा दाखल होताच स्वत: मोहित कंबोज यांनी ट्विट करत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "आज माझ्या विरुद्ध ईओडब्ल्यू मुंबईत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक बनावट एफआयआर नोंदवला आहे. माझ्या विरुद्ध एफआयआर करुन जर वाटत असेल की मी घाबरून जाईल तर तसं नाहीये. मी तथ्यांसह न्यायालयात जाईन." मोहित कंबोज यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओ असून त्यात त्यांनी म्हटलं, सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की माझ्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी एक एफआयआर नोंदवला आहे. जुनी कंपनी जी 2017 मध्ये बंद झाली आणि त्यात काही बँक इश्यूज काढत माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असं वाटतं की, महाविकास आघाडी सरकार माझा आवाज दाबेल किंवा मला कुठल्याही प्रकारे शांत करेल पण तसे होणार नाही. नवाब मलिक असो किंवा संजय राऊत असोत... आम्ही या सर्वांना घाबरणार नाही आणि कोर्टात जाऊन सत्य समोर आणणार. यापूर्वी तलवार नाचवल्या प्रकरणी गुन्हा दाखल नवाब मलिक यांना काल (23 फेब्रुवारी 2022) ईडीच्या अधिकाऱ्यांनी आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. भाजप नेत्यांवर आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना अटक होताच भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केल्याचं पहायला मिळालं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोहित कंबोज यांच्या निवासस्थानाजवळ फटाके फोडून जल्लोष केला तर यावेळी मोहित कंबोज हे तलवार नाचवताना दिसून आले. मात्र, ही तलवार नाचवणं मोहित कंबोज यांच्या अंगलट आलं. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवाल नाचवली. याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोहित कंबोज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Crime, Mumbai

    पुढील बातम्या