मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शेतकऱ्यांनी 22 तारखेला राज्यपालांना पाठवले होते पत्र, राजभवनाकडून दिले होते हे उत्तर

शेतकऱ्यांनी 22 तारखेला राज्यपालांना पाठवले होते पत्र, राजभवनाकडून दिले होते हे उत्तर

या पत्रात 25 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी भेट द्यावी अशी विनंती करण्यात आली होती.

या पत्रात 25 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी भेट द्यावी अशी विनंती करण्यात आली होती.

या पत्रात 25 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी भेट द्यावी अशी विनंती करण्यात आली होती.

मुंबई, 25 जानेवारी : शेकडो किलोमीटर पायपीट करून शेतकऱ्यांचा विराट मोर्चा (mumbai farmers protest) मुंबई धडकले. परंतु, राज्यभवनावर (governor bhagat singh koshyari) राज्यपाल गैरहजर असल्यामुळे शिष्टमंडळाला निवेदन फाडून निषेध केला. परंतु, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे 22 तारखेला लेखी परवानगी मागितली होती. मात्र, राज्यपाल हे गोव्यात असल्याने भेटू शकणार नाही, असे लेखी कळवण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना अभिनेत्री कंगना राणावतला भेटण्यासाठी वेळ आहे. पण शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही, अशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर राजभवनावर पोहोचल्यावर शिष्टमंडळाने राज्यपालांच्या सचिवांना निवेदन देण्यास नकार दिला. राज्यपाल जर शेतकऱ्यांचे ऐकणार नसतील तर निवेदन द्यायचे कशाला? असं म्हणून निवेदन फाडून टाकले. कोरोना लशीबाबत अफवा पसरवणाऱ्यांची आता खैर नाही; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय संयुक्त शेतकरी मोर्चाच्या वतीने 22 जानेवारी रोजी राजभवनावर एक पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रात 25 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी भेट द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. परंतु, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पूर्वनियोजित कार्यक्रमास्तव गोवा राज्यात असल्यामुळे शिष्टमंडळाला भेटू शकणार नाही, असे उत्तर राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी दिले होते. प्रधान सचिवांनी हे पत्र 24 जानेवारी रोजी दिली होते. विशेष म्हणजे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे 23 तारखेला मुंबईत हजर होते. त्यांनी एका कार्यक्रमाला सुद्धा हजेरी लावली होती. त्यानंतर राज्यपाल हे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी गोव्यात दाखल झाले होते. गोव्यात सुरू असलेल्या एक्कावन्नांव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि गायक विश्वजीत चटर्जी यांना `इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर` या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसंच, राज्यपालांचा गोव्याच्या विधिमंडळाचा कार्यक्रम हा 4 महिन्यांपूर्वीच ठरला होता. या कार्यक्रमासाठी सुद्धा राज्यपाल हजर राहणार आहे. भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार;पिंगली वेकय्या यांनी डिझाईन केलेला National Flag दरम्यान, मुंबईच्या आझाद मैदानातून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा हा मुंबईतच मुक्काम करणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने या संपूर्ण परिसराची स्वच्छ करण्यात आला आहे. आज रात्रभर राहणाऱ्या लोकांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी झेंडा वंदन केल्यानंतर शेतकरी आपल्या गावाला परतणार आहे.
First published:

पुढील बातम्या