• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Fake Vaccination Scam: बोगस लसीकरण प्रकरणात BMC ची मोठी कारवाई; मुंबईतील रुग्णालय सील

Fake Vaccination Scam: बोगस लसीकरण प्रकरणात BMC ची मोठी कारवाई; मुंबईतील रुग्णालय सील

व्हॅक्सीन म्हणजे काय ? जाणून घ्या कसं काम करतं ?

व्हॅक्सीन म्हणजे काय ? जाणून घ्या कसं काम करतं ?

BMC cancel license of Hospital: मुंबईत झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणात मुंबई महानगरपालिकेने एका रुग्णालयावर कारवाई केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 जुलै : मुंबईतील उच्चभू परिसरात बोगस लसीकरण (Mumbai Fake Vaccination Scam) झाल्याची माहिती उघडकीस आली आणि एकच खळबळ उडाली. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांच्या मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई करत मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई पोलिसांसोबत मुंबई महानगरपालिकेनेही (BMC) या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत एका रुग्णालयावर (BMC action against hospital) कारवाई केली आहे. (BMC cancels Shivam Hospital license) मुंबईतील कांदिवली परिसरात असलेल्या चारकोप (Charkop Kandivali) भागातील शिवम रुग्णालया (Shivam Hospital) वर मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी कारवाई केली आहे. पालिकेने शिवम नर्सिंग होमचा परवाना रद्द करून संपूर्ण परिसर सील केला आहे. मुंबई नर्सिंग होम्स नोंदणी कायदा 1949 अंतर्गत महानगरपालिकेने रुग्णालयाचा नोंदणी परवाना सुद्धा रद्द केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई मनपाच्या आर-दक्षिण वॉर्डचे अतिरिक्त आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी सांगितले की, आम्ही या रुग्णालयाचा परवाना रद्द केला आहे त्यामुळे यापुढे हे रुग्णालय सुरू ठेवता यणार नाहीये. आम्ही रुग्णालयाची इमारत सुद्धा सील केली आहे जेणेकरुन पुन्हा या ठिकाणी काही गैरकृत्य होऊ नये. बोगस लसीकरण प्रकरणात शिवम रुग्णालयाय हे मुख्य केंद्र असल्याचे पोलीस तपासात समोर आले यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार आम्ही रुग्णालयावर कारवाई केली आहे. दैनंदिन रुग्णांचा आकडा घटता घटेना; फक्त 5 जिल्ह्यांमुळे संपूर्ण राज्यावर पुन्हा Lockdown चं संकट काय आहे संपूर्ण प्रकरण 30 मे 2021 रोजी कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत लसीकरण करण्यात आले होते. सोसायटीमधील 390 सदस्यांकडून प्रत्येकी 1260 रुपये घेत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली होती. लसीकरणानंतर सोसायटीतील नागरिकांनी प्रमाणपत्राची मागणी केली असता लसीकरण आयोजकांनी लस घेतलेल्या सदस्यांची माहिती घेतली. त्यानंतर या सदस्यांना विविध रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये लस घेतल्याचे प्रमाणपत्र दिले. या प्रकरणी कांदिवली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून नागरिकांची फसवणूक केलेली 12,40,000 रुपये सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. तसेच एक कारही जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंग आणि मनिष त्रिपाठी यांची बँक खाते गोठवण्यात आली आहेत.
  Published by:Sunil Desale
  First published: