मुलीच्या नावाने फेसबुकवरून पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट, भेटायला बोलवून 5 लाखांना लुटले !

मुलीच्या नावाने फेसबुकवरून पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट, भेटायला बोलवून 5 लाखांना लुटले !

अनोळख्या मुलीची फेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. त्याने ती स्वीकारली. दोघांचेही फेसबुक मेसेंजरवर बोलणे सुरू झाले. १६ जानेवारीला मुलीने त्याला गोवंडी येथे भेटण्यासाठी बोलावले

  • Share this:

5 फेब्रुवारी : पार्किंगच्या वादातून हात उगारला म्हणून त्याने मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊंट तयार केले आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री केली. त्यानंतर त्याला बोलावून बेदम मारहाण करून 5 लाखांना लुटल्याची सिनेमास्टाईल घटना चेंबूरमध्ये घडलीये.

चेंबूरच्या माहूल गावातील गव्हाणपाडा परिसरात राहत असलेल्या हितेंद्र उर्फ बाबू ठाकूर याचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. ८ जानेवारी रोजी त्याला अनोळख्या मुलीची फेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. त्याने ती स्वीकारली. दोघांचेही फेसबुक मेसेंजरवर बोलणे सुरू झाले. १६ जानेवारीला मुलीने त्याला गोवंडी येथे भेटण्यासाठी बोलावले. ठाकूरही तेथे वेळेत हजर झाला. लांबून एका मुलीने हात दाखवून त्याला बोलावलं. तीच मुलगी असावी म्हणून तो जवळ गेला. तेव्हा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याला लोखंडी रॉड आणि स्टंपने चोप दिला आणि त्याच्याकडील ५ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. घटनेची वर्दी लागताच देवनार पोलिसांनी ठाकूरच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला. यावरून पोलिसानी 3 जणांना अटक केली.

अखेर तपासात काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत पार्किंगवरून त्यांच्यात वाद झाला. या वेळी तक्रारदार तरुणाने आरोपीच्या काकावर हात उगारला होता. याचाच बदला घेण्यासाठी आरोपीने मुलीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडले. यामार्फत तक्रारदाराची फसवणूक करत त्याला मारहाण करून लुटले.

First published: February 5, 2018, 5:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading