Mumbai Election Result 2019 LIVE : शिवडीमध्ये पुन्हा फडकला भगवा, शिवसेनेच्या अजय चौधरींनी राखला गड

शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी यांनी मोठा विजय मिळवला आहे.

शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी यांनी मोठा विजय मिळवला आहे.

  • Share this:
    मुंबई, 24 ऑक्टोबर : शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी यांनी मोठा विजय मिळवला आहे. अजय चौधरी यांनी 42, 000 मतांनी विजय मिळवत पुन्हा एकदा शिवडी मतदारसंघावर भगवा फडकवला आहे. चौधरी यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार उदय फणसेकर आणि मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दणदणीत पराभव केला आहे. चौधरींच्या तुलनते या दोन्ही उमेदवारांचा मतदारसंघात तितका जनसंपर्क नव्हता. अजय चौधरी यांचा विधानसभा निवडणूक 2014 मध्येही विजय 2009ची परिस्थिती वगळता 80च्या दशकापासून शिवडी मतदारसंघावर शिवसेनेचंच वर्चस्व आहे. मराठमोळ्या मतदारांच्या पाठिंब्यामुळे शिवडी मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. विधानसभेच्या २००९च्या निवडणुकीत शिवडी मतदारसंघातून दगडू सकपाळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. पण मनसेच्या बाळा नांदगावकरांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. पण त्यांचा करिश्मा 2014मध्ये दिसून आला नाही. 2014मधील विधानसभा निवडणुकीत अजय चौधरी यांनी विजय मिळवत नांदगावकरांना पराभवाची धूळ चारली. 2019च्या निवडणुकीत बाळा नांदगावकर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं चौधरी यांच्यासमोर विरोधकांकडून तगडा उमेदवार रिंगणात नव्हता. (वाचा : Mumbai Election Result 2019 LIVE : भाजपचे सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शहा विजयी) 2014 ची विधानसभेची परिस्थिती मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. एकूण जागा - 288 भाजप - 122 शिवसेना - 63 काँग्रेस - 42 राष्ट्रवादी - 41 (वाचा : निवडणुकीत एकच दादा, अजित पवार रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी) गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं. या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला. (वाचा : गुहागरमध्ये शिवसेनेचं पारडं जड, राष्ट्रवादीला मोठा धक्का) LIVE VIDEO : उदयनराजे अडचणीत, तर मनसेसाठी खूशखबर!
    First published: