Mumbai Election Result 2019 LIVE : भाजपचे सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शहा विजयी

Mumbai Election Result 2019 LIVE : भाजपचे सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शहा विजयी

मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पराग शहा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पराग शहा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पराग शहा यांचा 55 हजार मतांनी विजय झाला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून पराग शहा यांची ओळख आहे. शहा यांनी काँग्रेस उमेदवार मनिषा सूर्यवंशी यांचा पराभव केला आहे. पराग शहा यांची  स्थावर मालमत्तेचा व्यवसाय असून त्यांची एकूण संपत्ती 500 कोटी रुपयांच्या आसपास आहे. तर जंगम मालमत्ता 422 कोटी रुपये आहे. पराग यांचा व्यवसाय गुजरात आणि तमिळनाडूमध्ये पसरलेला असून गुजराती आणि जैन समुदायात ते अधिक प्रसिद्ध आहेत.

2017मध्ये लढवली बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक

2017 मध्ये पराग यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकून ते नगरसेवक झाले. त्या दरम्यान त्यांची संपत्ती ही 690 कोटी रुपये सांगण्यात आली होती. कोट्यधीश पराग शाह आणि त्यांची पत्नी यांच्याकडे 299 कोटी रुपयांचे शेअरही आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या संपत्तीत व्यावसायिक, निवासी, शेती आणि बिगर शेती जमिनी आहेत. वाहनांमध्ये पराग शहा यांच्याकडे अनेक नावाजलेल्या ब्रॅण्डचा गाड्या आहेत. यात स्कोडा रॅपिडपासून ते फरारीपर्यंतच्या गाड्यांचा समावेश आहे.

(पाहा  : LIVE VIDEO : धनंजय मुंडे झाले भावुक, कार्यकर्तेही जल्लोष करत रडले)

भाजपचे कोट्यधीश उमेदवार पराग शहा यांची संपत्ती -

एकूण संपत्ती -690 कोटी रुपये

स्वतःच्या नावावर - 397 कोटी रुपये

पत्नीच्या नावावर - 248 कोटी रुपये

मुलांच्या नावावरील संपत्ती - 44 कोटी रुपये

रोख पैसे आणि बँक बॅलन्स - 5 कोटी रुपये

शेअर्स आणि बाँडस् - 542 कोटी रुपये

पीएफ आणि इन्शुरन्स - 119 कोटी रुपये

(वाचा : कणकवली-देवगड मतदारसंघात भाजपचे उमेदवार नितेश राणे विजयी)

दागिने - 2 कोटी रुपये

गाड्या - 45 लाख रुपये

शेतजमीन -21 लाख रुपये

बिगर शेतीजमीन - 74 लाख रुपये

व्यावसायिक इमारत - 72 लाख रुपये

निवासस्थान - 17 कोटी रुपये

(वाचा :  Maharashtra Election Result : मुंबई, ठाण्यात भाजप नाही, तर शिवसेनाच 'मोठा भाऊ')

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.

LIVE VIDEO : नितेश राणे जिंकले, सेनेला टोला लगावत निलेश यांनी केला जल्लोष

First published: October 24, 2019, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading