'मी सदैव तुमचा आभारी राहीन',अजित दादांच्या निर्णयानंतर रितेश भावूक

'मी सदैव तुमचा आभारी राहीन',अजित दादांच्या निर्णयानंतर रितेश भावूक

मुंबईतील 'इस्टर्न फ्री वे' मार्गाला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : मुंबईतील 'इस्टर्न फ्री वे' मार्गाला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरु करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरविकास विभागाला केली. याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन दिली. या घोषणेनंतर विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख भावुक झालेला दिसला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं, मुंबईतल्या 'इस्टर्न फ्री वे' ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या. तसेच परिवहन विभागासोबतच्या बैठकीत राज्यातली परिवहन सेवा सुधारण्याबाबत चर्चा केली. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या ट्वीटनंतर रितेशनं त्यांचं ट्वीट रिट्वीट केलं, त्यानं लिहिलं, श्री विलासराव देशमुखजींनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला, त्या बद्दल - मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन श्री @AjitPawarSpeaks दादा. Eastern Free Way in Mumbai to be named after #VilasraoDeshmukh -

राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक मंगळवारी (14 जानेवारी ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिवहनसेवा सुधारण्यासंदर्भात अनेक सूचना केल्या. दिवंगत विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच 'इस्टर्न फ्री वे'च्या उभारणीतील त्यांचं योगदान लक्षात घेऊन 'इस्टर्न फ्री वे'ला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

याशिवाय एसटी महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांचे होणारे अपघात व नागरिकांमध्ये त्याबद्दल असलेल्या नाराजीची दखल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. वाहन अपघात रोखण्यासाठी मोटार वाहतूक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2020 12:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading