मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Drug Case: नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट, नव्या व्यक्तीच्या नावाचा केला खुलासा

Mumbai Drug Case: नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट, नव्या व्यक्तीच्या नावाचा केला खुलासा

Nawab Malik pc: नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.

Nawab Malik pc: नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.

Nawab Malik pc: नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई, 29 ऑक्टोबर : एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यासोबतच भाजप नेत्यांवरही गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे. आज पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी आणखी एका नव्या नावाचा उल्लेख केला आहे जो व्यक्ती वारंवार एनसीबीच्या कारवाईत पंच असल्याचा दावाही नवाब मलिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी एनसीबीचा स्वतंत्र पंच फ्लेचर पटेल याच्यावर आणि समीर वानखेडेंवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी फ्लेचर पटेल याच्यासोबत नव्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा केला आहे.

नवाब मलिकांनी म्हटलं, फ्लेचर पटेल फ्रॉड आहे. फ्लेचर पटेलचे समीर वानखेडेंसोबत जवळपास 10-12 वर्षांपासून संबंध आहेत. फ्लेचर पटेल याच्यासोबत आदिल उस्मानी हा सुद्धा एक व्यक्ती आहे जो अनेक प्रकरणात पंच आहे. तो इम्पोर्ट - एक्सपोर्टचं काम करतो. आदिल उस्मानी हा अनेक प्रकरणांत पंच कसा आहे? हा सुद्धा प्रश्न आहे.

ज्या गोसावीमुळे हे उघड झालं आहे, तो इथून दिल्लीला गेला. मग दिल्लीहून कोलकाता, उत्तरप्रदेशमध्ये गेला. सांगत होता उत्तरप्रदेश पोलिसांकडे आत्मसमर्पण करतो. मग त्याला महाराष्ट्रात त्याला फसवणुकीच्या प्रकरणात अटक झाली. अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत. मला वाटतं हा गोसावीच या सर्वांची पोलखोल करेल असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

हिवाळी अधिवेशनात मोठ-मोठी नावे समोर येणार

विधानसभा अधिवेशन वादळी ठरणार आहे. आत्ता बोलल्यावर ते कोर्टात जातील. विधानसभेत माझ्यावर जे काही आरोप होणार त्याचे उत्तर देताना जे काही मी समोर आणणार आहे. त्यामुळे या राज्यात त्यांना तोंड दाखवणं अवघड होणार आहे. अनेकांचा ड्रग्ज प्रकरणाची संबंध आहे. नेत्यांचे नाव आज मी घेत नाही. हिवाळी अधिवेशनात भाजपकडून माझे नाव घेऊन माझ्यावर हल्ले होणार आहेत. हिवाळी अधिवेशनात मोठी-मोठी नावे समोर येणार असं सूचक वक्तव्यही नवाब मलिकांनी केलं आहे.

वाचा : क्रांती रेडकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, नवाब मलिक म्हणाले 'मी रेडकर ताईंना सागू इच्छितो की... '

नवाब मलिकांनी पुढे म्हटलं, पण ज्यापद्धतीने पूर्ण भाजप यांच्यापाठी उभी राहिली आहे. सोमय्यांसोबत त्यांचा फोटोही व्हायरल झाला आहे. जी माझी शंका होती की जो भूत आहे त्याचे प्राण याच पोपटात आहेत आणि पोपट आता पिंजऱ्यात बंद होणार आहे त्यामुळे पूर्ण राक्षसी विचाराचे लोक घाबरू लागलेत. जर पोपट पिंजऱ्यात अडकला तर पूर्ण राज खुले होतील का?

समीर वानखेडे यांच्यामागे भाजपचे नेते उभे राहिले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला बदनाम करण्याचं षडयंत्र वानखेडेंच्या माध्यमातून केला जात आहे हे मी आधीपासूनच सांगत आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न वानखेडेंकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे.

First published:

Tags: Drug case, Mumbai, Nawab malik, NCB