कोकेनपासून हॅशिशपर्यंत... समुद्र किनारी Cordelia क्रूझवर ड्रग्स पार्टीमध्ये काय-काय मिळाले NCBला? एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या मुलाने चौकशी दरम्यान सांगितले की, त्याला तेथे व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते. यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन आकारण्यात आलेले नव्हते. यापूर्वी अशी माहिती समोर आली होती की जवळपास 80000 रुपये एन्ट्री फी घेण्यात आली होती. मात्र, रात्री चौकशी दरम्यान अभिनेत्याच्या मुलाने सांगितले की, आपल्या नावाचा आणि चेहऱ्याचा वापर करण्यात आला जेणेकरुन इतरांना वाटेल की इतक्या मोठ्या सेलिब्रेटीचा मुलगा क्रूझवर आहे तर आपणही क्रूझवर पार्टीला जायला हवे.#WATCH | Narcotics Control Bureau (NCB) detained at least 10 persons during a raid conducted at a party being held on a cruise in Mumbai yesterday
(Visuals from outside NCB office) pic.twitter.com/yxe2zWfFmI — ANI (@ANI) October 2, 2021
अजून कोणालाही अटक नाहीये, रात्री ताब्यात घेतलेल्या सेलिब्रिटीच्या मुला व्यक्तीरिक्त इतर कोणीही सेलिब्रिटी किंवा त्यांच्या मुलांना ताब्यात घेतले नाहीये. या संपूर्ण प्रकरणात एनसीबीचे अधिकारी अधिक तपास करत आहेत अशी माहिती समोर येत आहे. गेस्ट रूममध्ये आढळले पेपर रोल या प्रकरणात आणखी एक मोठी गोष्ट समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की, या पार्टीत सहभागी झालेल्या सर्वांना पेपर रोल देण्यात आले आहे. एनसीबीने केलेल्या कारवाई दरम्यान गेस्ट रूममधून मोठ्या प्रमाणात पेपर रोल आढळून आले आहेत. कोड वर्ड वापरुन आयोजित केलेली क्रुझवरील ड्रग्ज पार्टी मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीचा एनसीबीने पर्दाफाश केला आहे. या क्रुझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. हे क्रुझ गोव्याला निघाले होते. ड्रग्स पार्टी सुरू होताच एनसीबीने धडक कारवाई सुरू केली. NCB ला तीन दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती मिळाली होती. कोड वर्ड वापरुन ही पार्टी आयोजित केली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. INSIDE STORY : मुंबईच्या समुद्रात Cordelia Cruise वर ड्रग्स पार्टी, NCB चं असं चाललं ऑपरेशन! काय घडलं नेमकं? एनसीबीच्या पथकाने मुंबईतील समुद्रात Cordelia या क्रुझरवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला करण्यात आला अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने छापा मारला. या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्स, एमडी ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईमध्ये अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बॉलिवूडमधील एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. 3 दिवस चालणार होती क्रुझवर ड्रग्स पार्टी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एनसीबीच्या पथकांनी अनेक ड्रग्स तस्कारांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे मुंबईत ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणले आहे. अशाच मुंबईच्या धर्तीवरून निघून मोकळ्या समुद्रात ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण, एनसीबीने मोठ्या शिताफीने ही पार्टी उधळून लावली आहे. नव्या माहितीप्रमाणे हे क्रुझ आजपासून मुंबईपासून गोव्याला 3 दिवसांसाठी रवाना होणार होते. मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना इतर अधिकाऱ्यांसह प्रवासी म्हणून उभ्या असलेल्या जहाजावर पोहोचल्याची टीप मिळाली. जेव्हा जहाज मुंबईहून निघाले आणि मध्य समुद्रात पोहोचेल, तेव्हा पहिल्या पार्टीला सुरुवात झाली आणि जिथे ड्रग्जचे सेवन केले जात होते.#WATCH | Narcotics Control Bureau (NCB) yesterday detained at least 10 persons during a raid conducted at a party being held on a cruise in Mumbai
(Earlier visuals from outside NCB office) pic.twitter.com/c0OctLI1jk — ANI (@ANI) October 2, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.