डॉ.पायल तडवी आत्महत्या.. सुसाइड नोटमधून समोर आले धक्कादायक खुलासे

डॉ.पायल तडवी आत्महत्या.. सुसाइड नोटमधून समोर आले धक्कादायक खुलासे

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. पायलची सुसाइड नोट उजेडात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै- डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. पायलची सुसाइड नोट उजेडात आली आहे. 'हे पाऊल उचलण्यासाठी आई-बाबा मला क्षमा करा...एक उत्तर डॉक्टर बनण्याची माझी इच्छा होती, परंतु या लोकांनी माझी इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. माझी सहन करण्याची क्षमता आता संपली आहे. मला प्रत्येक वेळी टार्गेट केले जात आहे. प्रत्येक कामात अडवण्यात येत आहे. मला एक गायनोलॉजिस्ट बनायचे होते. परंतु सीनियर्सनी मला एकही केस हाताळण्याची संधी दिली नाही. ऑपरेशन थिएटरमध्येही त्यांनी मला कधी जाऊ दिले नाही. लेबर पेन केसही हाताळू दिली नाही. कायम ओपीडीमध्येच पाठवत होते. माझे मानसिक खच्चीकरण करत होते. त्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे. याला तीन महिला डॉक्टर जबाबदार आहेत, मला क्षमा करा..' असे डॉ. पायलने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहिले आहे.

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश गुरूवारी न्यायमूर्ती डी. एस. नायडू यांनी दिले आहेत. अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतूदीनुसार खटल्याची व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे आवश्यक असल्याची बाब तक्रारदाराचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिले. त्यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायमूर्ती नायडू यांनी मंगळवारी होणारी पुढील सुनावणी रेकॉर्ड करण्याची व्यवस्था करण्याचे हायकोर्ट प्रशासनाला निर्देश दिले आहेत. एवढेच नाही तर न्यायमूर्ती नायडू यांनी आपण स्वत: देखील आयपॅडवर सुनावणीचे व्हॉईस रेकॉर्डिंग करत असल्याचे उपस्थितांना दाखवले. या प्रकरणी पुढील सुनावणी 30 जुलै निर्धारित करण्यात आली आहे.

दरम्यान, डॉ. पायलने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी 23 मे रोजी गुन्हा नोंदवून नायर हॉस्पिटलमधील तिच्या तीन सहकारी महिला डॉक्‍टरांना अटक केली आहे. यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्‍टरांवर रॅगिंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

सचिन अहिर यांच्या खेळीवर अजित पवार संतापले, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbai
First Published: Jul 25, 2019 07:17 PM IST

ताज्या बातम्या