मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत कंडोम वापराचे प्रमाण दुप्पट; पण 10 पैकी दोनच पुरुष देतात वापरास प्राधान्य

मुंबईत कंडोम वापराचे प्रमाण दुप्पट; पण 10 पैकी दोनच पुरुष देतात वापरास प्राधान्य

पुरुषांकडून कंडोमचा (Condom) वापर वाढत असून, त्यातुलनेत गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर (Contraceptive Pills) आणि नसबंदी करण्याकडे महिलांचा कल लक्षणीय कमी झाल्याचं नॅशनल फॅमिली हेल्थ  सर्व्हेतून (National Family Health Survey 5) स्पष्ट झालं आहे

पुरुषांकडून कंडोमचा (Condom) वापर वाढत असून, त्यातुलनेत गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर (Contraceptive Pills) आणि नसबंदी करण्याकडे महिलांचा कल लक्षणीय कमी झाल्याचं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेतून (National Family Health Survey 5) स्पष्ट झालं आहे

पुरुषांकडून कंडोमचा (Condom) वापर वाढत असून, त्यातुलनेत गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर (Contraceptive Pills) आणि नसबंदी करण्याकडे महिलांचा कल लक्षणीय कमी झाल्याचं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेतून (National Family Health Survey 5) स्पष्ट झालं आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 21 डिसेंबर : गर्भधारणा टाळण्यासाठी  नवविवाहित जोडपी विविध गर्भनिरोधक साधनांचा (Contraceptive) वापर करतात. लोकसंख्या नियंत्रणाच्या अनुषंगाने ही बाब महत्वाची आहे. विविध गर्भनिरोधक साधनांच्या वापराबाबत आढावा घेता, गेल्या पाच वर्षांत महिलांच्या तुलनेत पुरुषांनी गर्भनिरोधक साधनांचा अधिक वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांत पुरुषांकडून कंडोमचा (Condom) वापर वाढत असून, त्यातुलनेत गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर (Contraceptive Pills) आणि नसबंदी करण्याकडे महिलांचा कल लक्षणीय कमी झाल्याचं नॅशनल फॅमिली हेल्थ  सर्व्हेतून (National Family Health Survey 5) स्पष्ट झालं आहे, असं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. याबाबत पॉप्युलेशन कौन्सिल आफ इंडियाचे (Population Council Of India) डॉ. राजीब आचार्य यांनी सांगितलं की पुरुषांचा कुटुंब नियोजनात महत्वाचा रोल आहे, असं या सर्वेक्षणातून स्पष्ट होतं. केंद्रशासित प्रदेशांचं सर्वेक्षण आणि 22 राज्यांतील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वेक्षण यातून हा बदल दिसून आलाय. हे ही वाचा-Alert! ब्रिटनमधील नव्या Corona Virus मुळे भारतासह 'या' देशांनी घातली प्रवास बंदी गेल्या पाच वर्षांत जन्मदर नियंत्रण (Birth Control) आणि कुटुंब नियोजन (Family Planning) प्रक्रियेत पुरुष अधिक जबाबदारीची भूमिका निभावताना दिसून येत असून नसबंदी, गर्भनिरोधकांचा वापर करण्याची सर्वाधिक जबाबदारी महिलांची आहे. या पध्दतीचा थेट रोख महिलांमधील नसबंदीकडे जात असला तरी कंडोमचा वाढता वापर ही पुरुषांचा या प्रक्रियेत थेट सहभाग दर्शवणारी महत्वाची सुधारणा म्हणता येईल, असे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या (Family Planning Association Of India) डॉ. मनीषा भिसे यांनी स्पष्ट केलं. मुंबई शहराचा (Mumbai City) विचार करता, 10 पैकी 7 विवाहित जोडपी कुटुंब नियोजनासाठीच्या पध्दतींचा अवलंब करण्यासाठी अनुकूल होती. एनएफएचएस-4 च्या सर्व्हेनुसार 2015-16 मध्ये हे प्रमाण 59.3 टक्के होते, ते एनएफएचएस – 5 च्या सर्व्हेनुसार हे प्रमाण 2019-20मध्ये वाढून 74.3 टक्क्यांवर पोहोचले. याच काळात कंडोम वापरण्याचे प्रमाण वाढून ते 11.7 टक्क्यांवरुन 18.1 टक्क्यांपर्यंत पोहोचले. तसेच महिलांमधील नसबंदीचे प्रमाण 47 टक्क्यांवरुन 36.1 टक्क्यांपर्यंत घटले. याच कालावधीत गर्भनिरोधक गोळ्या सेवन करण्याचे प्रमाण 3.1 टक्क्यांवरुन 1.9 टक्क्यांपर्यंत कमी झाले. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने वजन वाढण्याची भीती शहरी भागातील महिलांमध्ये असल्याचे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. किरण कोएल्हो यांनी सांगितलं. हे ही वाचा-Winter Solstice : वर्षातल्या सर्वात लहान दिवसाच्या शेवटी दिसणार 'महायुती' मुंबईतील उपनगरांमध्ये (Mumbai Suburbs), एनएफएचएस -5 च्या सर्व्हेनुसार कंडोमचा वापर दुप्पट म्हणजेच 8.9 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. परंतु 10 पैकी केवळ दोनच पुरुष कंडोम वापरण्यास प्राधान्य देत आहेत. तसेच महिलांवर अवलंबून असलेल्या विविध पध्दतींच्या वापरात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. ज्यात महिलांमधील नसबंदीचे प्रमाण 43 वरुन 37.5 टक्क्यांपर्यंत घटले तर गर्भनिरोधक गोळ्यांच्या (Contraceptive Pills) सेवनात 5.3 वरुन 0.9 टक्क्यांपर्यंत घट झाली. नोकरदार दांपत्यांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेक्स करणे शक्य होते. अशावेळी महिलांना दररोज गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करायला लावण्यापेक्षा पुरुष कंडोमचा वापर करण्यास प्राधान्य देतात, असे डॉ. कोएल्हो यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील महाराष्ट्राचा डाटा पाहता, त्यात मोठे बदल झाल्याचे दिसून येत नाहीत. परंतु कंडोम (Condom) वापरण्याचे 7.1 टक्क्यांवरुन 10 टक्के झाल्याचे दिसते. तसेच महिलांमधील नसबंदीचे प्रमाण 50.7 टक्क्यांवरुन 49.1 टक्क्यांवर आल्याचं दिसतं तर गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापराचं प्रमाण 2.4 वरुन 1.8 टक्क्यांवर आलं आहे. जवळपास 17 राज्यांमध्ये कुटुंब नियोजनासाठी (Family Planning) आधुनिक गर्भनिरोधक साधनांचा वापर केला जात असल्याचं एनएफएचएस -5 च्या पहिल्या टप्प्यातील सर्व्हेतून स्पष्ट होतं. दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासाठीच्या पध्दतींचा वापर देशात सर्वत्र वाढत आहे. बिहारमध्ये महिलांमधील नसबंदीचे (Sterilisation) प्रमाण एकेकाळी 90 टक्क्यांपर्यंत होतं. मात्र गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरामुळे हे प्रमाण लक्षणीय घटलं असल्याचे डॉ. आचार्य म्हणाले. महिलांमध्ये वयाच्या 18 वर्षापूर्वी लग्न करण्याचे घटते प्रमाण आणि त्यांना किमान 10 वर्ष शिक्षण घेणे शक्य होत असल्यामुळे गर्भनिरोधक पध्दतीत बदल झाल्याचे स्पष्ट होते. या दोन्ही कारणांमुळे आधुनिक गर्भनिरोधक (Contraceptive) साधनांचा वापर वाढत असल्याचे डॉ. भिसे यांनी सांगितले.
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या