Elec-widget

 मुंबईकरांनो, गरज असेल तरच घराबाहेर पडा !  

 मुंबईकरांनो, गरज असेल तरच घराबाहेर पडा !  

आजही हवामान खात्यानं दुपारनंतर जोरदार पावसाचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं नाही तर पडू नये असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

  • Share this:

मुंबई,30 ऑगस्ट: मुंबईत काल मुसळधार पाऊस पडला. आजही हवामान खात्यानं दुपारनंतर जोरदार पावसाचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं नाही तर पडू नये असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

काल मुंबई शहरात 102 मि.मी तर उपनगरांमध्ये तब्बल 316 मि.मी पावसाची नोंद झाली. पावसामुळे काल तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते तुंबले होते. आज वेधशाळेनं जोरदार पाऊस होणार असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आजही पाऊस पडल्यास बाहेर फिरणे कठीण होऊ शकते म्हणून आज बाहेर पडूच नये असा सल्ला देण्यात आलाय.

मुंबईतील शाळा कॉलेजेस आणि अनेक ऑफिसेस आज बंद राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2017 09:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...