डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ही मागणी

डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ही मागणी

मुंबईत आज डोंगरीमध्ये अनधिकृत इमारत पडून झालेल्या दुर्घटनेमुळे मुंबईतील इतरही अतिधोकादायक इमारतींचा प्रश्नं पुन्हा एकदा गंभीर बनला आहे

  • Share this:

उदय जाधव, प्रतिनिधी

मुंबई, 16 जुलै : मुंबईतील डोंगरी भागातली केसरबाई ही इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेप्रकरणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आणि मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्वविकासाचे अडथळे दूर करण्यासंदर्भात ठोस कायदा करण्यांसंदर्भात चर्चा केली.

मुंबईत आज डोंगरीमध्ये अनधिकृत इमारत पडून झालेल्या दुर्घटनेमुळे मुंबईतील इतरही अतिधोकादायक इमारतींचा प्रश्नं पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. मुंबईत उपकर प्राप्त आणि बिगर उपकर प्राप्त धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी नगरविकास विभागामार्फत संबंधीत कायद्यामध्ये सुधारणा करण्यात यावी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

तसंच एसआरएच्या तीन ब मध्येही अनेक सुधारणा आवश्यक असल्याचं आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधीसुचना काढावी असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात सकारात्मक विचार करून मागणी पुर्ण करू, असं आश्वासन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना दिलं.

दुर्घटनेत 10 जणांचा बळी

डोंगरी भागातली कौसरबाग ही इमारत मंगळवारी कोसळली. दुपारी बारा वाजून 10 मिनिटांनी ही चार मजली इमारत कोसळली. या इमारतीत 15 कुटुंब वास्तव्याला होती. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्याबरोबर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं. स्थानिक रहिवासी बचावकार्यात सहभागी झाले. बचावकार्य वेगानं सुरूवात करण्यात आलं. ढिगाऱ्याखालून एका चिमुरड्याला बाहेर काढण्यात आलं. जखमींना तातडीनं जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र या परिसरातल्या छोट्या गल्ल्यांमुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता.

म्हाडाच्या मालकीची ही इमारत 80 वर्ष जुनी होती. ही इमारत पुनर्विकासासाठी बिल्डरकडे देण्यात आली होती. पुनर्विकासासाठी बिल्डरकडे देण्यात आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाचं काम का सुरू करण्यात आलं नाही, असा सवाल आता निर्माण झाला आहे. इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरला हॉटेल आणि बेकरी होती, असं स्थानिकांनी सांगितलं.

या इमारतीतल्या 15 कुटुंबांवर मोठं संकट कोसळलंय. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. शहरातल्या जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा ऐरणीवर आला.

================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2019 11:35 PM IST

ताज्या बातम्या