Home /News /mumbai /

लग्नाचे वचन देत मुंबईच्या डॉक्टरांनी वारंवार केला बलात्कार; आता तर दुष्कृत्याची सीमाच गाठली

लग्नाचे वचन देत मुंबईच्या डॉक्टरांनी वारंवार केला बलात्कार; आता तर दुष्कृत्याची सीमाच गाठली

डॉक्टरांकडून हे दुष्कृत्य केलं जात असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

    मुंबई, 30 ऑक्टोबर : देशात सुरू असलेल्या बलात्काराच्या घटनांमुळे लोकांचा राग शिगेला पोहोचला आहे. देशात वारंवार या घटना घडत असल्याने पुन्हा एका महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान  महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील पोलिसांनी मुंबईतील एका डॉक्टरांवर आपल्या सहकारीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकारीने गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 30 वर्षीय महिलेने डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, ज्यानुसार एका डॉक्टरांवर  बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने महिलेला लग्नाचं खोटं वचन देत जुलै 2018 आणि सप्टेंबर 2020 दरम्यान बलात्कार केला. पालघर पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, ती गर्भवती झाली आहे आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे.आरोपीने तिला धमकी दिली आहे की, जर तिने गर्भपात करण्यास नकार दिला तर तिचे आपत्तीजनक व्हिडीओ सार्वजनिक करण्यात येईल. तो तिला त्रास होत देत होता. हे ही वाचा-डोली उठण्याआधी निघाली वडिलांची अंत्ययात्रा, धाकट्या मुलीनं दिला मुखाग्नी पोलिसांनी सुरू केला तपास डहाणू पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारीवर तपास सुरू करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी बुधवारी आयपीएसच्या विविध कलमांअतर्हत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण घटले होते. मात्र या सात महिन्यात हळूहळू लॉकडाऊन शिथिल होत आहे. तेच गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mumbai, Palghar, Rape

    पुढील बातम्या