नायर हॉस्पिटल रॅगिंग-आत्महत्या प्रकरण : अधिष्ठातांना राज्य महिला आयोगाची नोटीस

मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर पायल तडवी यांनी रॅगिंगच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 27, 2019 07:29 PM IST

नायर हॉस्पिटल रॅगिंग-आत्महत्या प्रकरण : अधिष्ठातांना राज्य महिला आयोगाची नोटीस

मुंबई, 27 मे :  मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर पायल तडवी यांनी रॅगिंगच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी नायर हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई करण्यासोबतच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगानं मागितला आहे.



Loading...


नेमके काय आहे प्रकरण?

वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून 26 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरनं आत्महत्या करून आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील ही घटना आहे. पायल तडवी असं आत्महत्या करणाऱ्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरचं नाव आहे. पायल यांनी 22 मे रोजी रुग्णालयाच्या परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांनी जातीयवादी टीका करून पायलचं रॅगिंग केल्याचा आरोप पायल यांच्या कुटुंबीयांनी केला. याप्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या तिघीही फरार आहेत.

पाहा :VIDEO: वांद्रे स्थानकात राडा, टीसीकडून प्रवाशाला शिवीगाळ आणि मारहाण

प्राध्यपकांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

पायल तडवी यांची आई अबेदा तडवी यांनी केलेल्या आरोपानुसार,'रॅगिंगसंदर्भात पायलनं तिच्या प्राध्यापकांकडे तक्रारदेखील केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आत्महत्या करण्यापूर्वी पायलनं मला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास फोन करून तिचा प्रचंड प्रमाणात मानसिक छळ होत असल्याचं सांगितलं. यापूर्वीही तिनं याबाबतची तक्रार माझ्याकडे केली. तेव्हा मी स्वतः प्राध्यापकांच्या कानावर ही गोष्ट घालत या प्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती केली, पण याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं गेलं. मी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनाही भेटण्याचा प्रयत्न केला, पण परवानगी मिळाली नाही. अखेर तिनं आत्महत्या करून आयुष्य संपवलं. माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या'.

पाहा :VIDEO: 'जातीय तेढ पसरवणारे व्हिडिओ निर्माण करण्यात शिवसेनेचा हात'



अधिष्ठातांनी विभागप्रमुखांना बजावली नोटीस

पायल तडवी या मूळच्या जळगाव जिल्ह्यातील रहिवासी होती. स्त्रीरोग तज्ज्ञ पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रमासाठी त्यांनी टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. हा उपक्रम 1 मे 2018पासून नायर रुग्णालयाशी संलग्न आहे.  यादरम्यान डिसेंबर 2018मध्ये पायल यांनी वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली होती. पायल तडवी यांचे पती डॉ. सलमान यांनीही विभाग प्रमुख डॉ. शिरोडकर यांची भेट घेऊन  पत्नीला होणाऱ्याला त्रासाची तक्रार केली. यानंतर दोन महिन्यांसाठी पायल यांचं युनिट बदलण्यात आलं. पण दोन महिन्यांनंतर पूर्वीच्या युनिटमध्ये दाखल झाल्यानंतर मानसिक छळ पुन्हा सुरू झाला, असा आरोप त्यांच्या पतीनं केला.

पाहा :VIDEO: दादरमध्ये जळीतकांड! पार्किंगमधील 5 दुचाकी जाळल्या

प्रकरणाचं गांभीर्य पाहता रुग्णालयाचे अधिष्ठातांनी स्त्रीरोग तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ. एसडी शिरोडकर आणि पायल यांच्या युनिट प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पायल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार केलेली असतानाही योग्य ती कारवाई का केली नाही?याचं उत्तर अधिष्ठातांनी दोघांकडेही मागितलं आहे. याप्रकरणी कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

SPECIAL REPORT: रॅगिंगला आणखी किती विद्यार्थी बळी पडणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 27, 2019 06:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...