रॅगिंगला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या, मुंबईच्या नायर रुग्णालयातील 3 डॉक्टर फरार

रॅगिंगला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या, मुंबईच्या नायर रुग्णालयातील 3 डॉक्टर फरार

वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून 26 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरनं आत्महत्या करून आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील ही घटना आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मे : वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून 26 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरनं आत्महत्या करून आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील ही घटना आहे. पायल तडवी असं आत्महत्या करणाऱ्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरचं नाव आहे. पायलनं 22 मे रोजी रुग्णालयाच्या परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांनी जातीयवादी टीका करून पायलचं रॅगिंग केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. याप्रकरणी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर या तिघीही फरार झाल्या आहेत.

पाहा :VIDEO: वांद्रे स्थानकात राडा, टीसीकडून प्रवाशाला शिवीगाळ आणि मारहाण

प्राध्यपकांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

पायल तडवीची आई अबेदा तडवी यांनी केलेल्या आरोपानुसार,'रॅगिंगसंदर्भात पायलनं तिच्या प्राध्यापकांकडे तक्रारदेखील केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आत्महत्या करण्यापूर्वी पायलनं मला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास फोन करून तिचा प्रचंड प्रमाणात मानसिक छळ होत असल्याचं सांगितलं. यापूर्वीही तिनं याबाबतची तक्रार माझ्याकडे केली. तेव्हा मी स्वतः प्राध्यापकांच्या कानावर ही गोष्ट घालत या प्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती केली, पण याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं गेलं. मी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनाही भेटण्याचा प्रयत्न केला, पण परवानगी मिळाली नाही. अखेर तिनं आत्महत्या करून आयुष्य संपवलं. माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या'.

पाहा :VIDEO: 'जातीय तेढ पसरवणारे व्हिडिओ निर्माण करण्यात शिवसेनेचा हात'

अधिष्ठातांनी विभागप्रमुखांना बजावली नोटीस

पायल तडवी ही मूळची जळगाव जिल्ह्यातील रहिवासी होती. स्त्रीरोग तज्ज्ञ पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रमासाठी तिनं टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. हा उपक्रम 1 मे 2018पासून नाय रुग्णालयाशी संलग्न आहे.  यादरम्यान डिसेंबर 2018मध्ये पायलनं वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली होती. पायल तडवीचे पती डॉ. सलमान यांनीही विभाग प्रमुख डॉ. शिरोडकर यांची भेट घेऊन  पत्नीला होणाऱ्याला त्रासाची तक्रार केली. यानंतर दोन महिन्यांसाठी पायलचं युनिट बदलण्यात आलं. पण दोन महिन्यांनंतर पूर्वीच्या युनिटमध्ये दाखल झाल्यानंतर मानसिक छळ पुन्हा सुरू झाला, असा आरोप तिच्या पतीनं केला.

पाहा :VIDEO: दादरमध्ये जळीतकांड! पार्किंगमधील 5 दुचाकी जाळल्या

कारवाई का केली नाही ? - नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता

प्रकरणाचं गांभीर्य पाहता रुग्णालयाचे अधिष्ठातांनी स्त्रीरोग तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ. एसडी शिरोडकर आणि पायलच्या युनिट प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पायल आणि तिच्या कुटुंबीयांनी तक्रार केलेली असतानाही योग्य ती कारवाई का केली नाही,याचं उत्तर अधिष्ठातांनी दोघांकडेही मागितलं आहे. याप्रकरणी कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

SPECIAL REPORT: रॅगिंगला आणखी किती विद्यार्थी बळी पडणार?

First published: May 27, 2019, 5:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading