गर्भपातासंदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्णय; 20 आठवड्यांनंतरही पाडू शकणार गर्भ पण...

गर्भपातासंदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्णय; 20 आठवड्यांनंतरही पाडू शकणार गर्भ पण...

बाँबे हायकोर्टाने गर्भपातासंदर्भात बुधवारी एक ऐतिहासिक निकाल दिला. आईच्या जीवाला धोका असेल तर 20 आठवड्यांनंतर गर्भपात करायला कोर्टाची परवानगी मागायची आवश्यकता नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 एप्रिल : बाँबे हायकोर्टाने गर्भपातासंदर्भात बुधवारी एक ऐतिहासिक निकाल दिला. आईच्या जीवाला धोका असेल तर 20 आठवड्यांनंतर गर्भपात करायला  कोर्टाची परवानगी मागायची आवश्यकता नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. न्या. अभय ओक आणि न्या. एम. एस. संकलेचना यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

भारतात 20 आठवड्यापेक्षा जास्त गर्भ असेल तर गर्भपात करता येत नाही. गुन्हा नोंदवला जातो. गरोदरपणात नंतरच्या काळात काही गुंतागुंत निर्माण झाली, तर आईचा जीव वाचवण्यासाठी काही वेळा गर्भपात करण्याची वेळ येते. पण डॉक्टरांना हा निर्णय घेण्याअगोदर कोर्टाची परवानगी घ्यावी लागते.

गरोदरपणाच्या 20 व्या आठवड्यानंतर गर्भात काही व्यंग असल्याचं लक्षात आलं आणि त्याचा आईच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर परिणाम होणार असं जाणवलं तर संमतीने गर्भपात करण्याचा अधिकार डॉक्टरांना आहे. त्यासाठी कोर्टात जायची गरज नाही, असा या निकालाचा अर्थ आहे.

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्टनुसार गर्भारपणात किंवा बाळाच्या जन्मानंतर आईच्या शारीरिक आरोग्याला असलेला धोका लक्षात आला तर 20 आठवड्यांनंतरसुद्धा गर्भपात करण्याची परवानगी मिळू शकते. पण या कायद्यात महिलेच्या मानसिक आरोग्याचा उल्लेख कुठेही नाही. गर्भाची अवस्था नॉर्मल नसेल तर काय करायचं याचा उल्लेखही यात नाही. भारतात 12 आठवड्यांपर्यंतच अधिकृतपणे गर्भपात करता येतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरतो.

मुंबईत चर्चगेट स्थानकावर भरगर्दीत चोरट्याने मोबाईल पळवला, VIDEO व्हायरल

First published: April 4, 2019, 6:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading