• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • डॉक्टर असलेल्या मुंबईच्या माजी महापौरांनी सांगतल्या कोरोनाविषयी Tips; घरीच करु शकता हे उपाय

डॉक्टर असलेल्या मुंबईच्या माजी महापौरांनी सांगतल्या कोरोनाविषयी Tips; घरीच करु शकता हे उपाय

कोरोनाच्या या संकटकाळात अनेकजण घाबरून जातात मात्र, आपण न घाबरता या संकटाला तोंड द्यायला हवे. याच संदर्भात मुंबईच्या माजी महापौरांनी काही खास टिप्स दिल्या आहेत.

  • Share this:
मुंबई, 27 एप्रिल: गेल्या वर्षभरातील कोरोनामुळे (Corona) उद्भवलेली परिस्थिती पाहता आपल्या देशात आरोग्य व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजलेत हे लक्षात आलं. मुंबई (Mumbai) काय गाव काय सर्व ठिकाणी परिस्थिती सारखीच गंभीर आहे. माझी आपल्याला हात जोडून हीच विनंती की काळजी घ्या, जराशी जरी लक्षणे दिसली तरी तुमच्या चांगल्या फॅमिली डॉक्टरला (Family Doctor) दाखवा. रिपोर्ट यायची वाट बघू नका, रिपोर्ट काही असू दे, आपण आपल्याला साधा सर्दी-ताप जरी झाला असेल तरी तो कोरोनाचाच आहे अस धरूनच चालायचं आणि पहिल्या दिवसापासून पथ्य पाळायला सुरुवात करायची असा सल्ला मुंबईच्या माजी महापौर आणि सदस्य, कोविड टास्कफोर्स, महाराष्ट्र शासन डॉ. शुभा राऊळ (Ex mayor of Mumbai Dr Shubha Raul) यांनी दिला आहे. पाहूयात त्यांनी आणखी काय सल्ले दिले आहेत. जमेल तितकं पोटावर झोपायचं वाफ घेणे, गरम पाणी सतत पिणे, (तुळस, पुदिना आलं दालचिनी वेलची तसेच डायबिटीस नसेल तर गूळ) असा काढा करून थर्मासमध्ये भरून ठेवायचा व दिवसातून तीन-चार वेळा पीत राहायचं, प्राणायाम व हलका व्यायाम, ताजा व हलका आहार घ्यायचा, आवळा सुंठ व हळद यांचं मिश्रण करून ठेवायचं व एक चमचा दिवसातून दोन वेळा गरम पाण्याबरोबर घ्यायचं. झोपताना जितकं जमेल तितकं पोटावर झोपायचं ज्याने फुफ्फुसांवरचा ताण कमी होतो, श्वास मोकळेपणाने घेता येतो. रोज उन्हात बसायचे रोज अडीच तास सकाळी सात ते साडे नऊ उन्हात बसायचे. उन्हात बसूनच व्यायाम वाचन प्राणायाम, नाश्ता  हे सर्व करायचं. सूर्य हा एकमेव इम्युनिटीचा व शक्तीचा प्रचंड मोठा साठा उपलब्ध आहे भारत देशासाठी, आपण भाग्यवान आहोत. युरोप सारख्या देशात सूर्यप्रकाश मुबलक उपलब्ध नाही म्हणून त्यांना विटामिन डी च्या गोळ्या खाव्या लागतात. नैसर्गिक मिळणारा सूर्यप्रकाश सेवन केला तर सिंथेटिक पद्धतीच्या विटामिन डी च्या गोळ्या घ्यायची आपल्याला अजिबात गरज नाही. वाचा: Maharashtra Lockdown updates: राज्यातील लॉकडाऊन 14 दिवस वाढणार?, विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत METHYLENE BLUE  हे सोल्युशन (एक ग्राम पावडर एक लिटर पाणी) बनवून त्यातला अर्धा चमचा जिभेखाली रोज संध्याकाळी 15 सेकंदासाठी ठेवणे, नंतर थोडं पाणी तोंडात टाकायचं पूर्णा घशात फिरवायचं गुळणी केल्या सारखं करायचं व पिऊन टाकायचं (कोरोना असो किंवा नसो, सर्वांनी. त्याचा प्रचार डॉक्टर गोलवलकर, (MD, pulmonologist) करत आहेत आणि त्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. अनेक जणांना मी हे सोल्युशन घ्यायला सांगितले आहे. मी सुद्धा गेले पाच महिने घेत आहे. अजिबात साईड इफेक्ट नाही, यूट्यूबवर पाहू शकता methylene blue on covid, by dr. golvalkar असे type करा.) घरात सुद्धा सर्वांनी मास्क वापरायचा घरातल्या एकाला जरी लक्षणे दिसली तरी सर्वांनी वरील उपाय सुरू करायचे. बाकी तुमचा जवळचा फॅमिली डॉक्टर सांगणार, ती औषधे (antibiotics, antiviral, vitamins) सुद्धा सुरू करा. शक्यतो हॉस्पिटलमध्ये जाण्याची पाळी येणार नाही. कारण तिथे सुद्धा औषधांचा ऑक्सिजनचा वेंटीलेटरचा एवढा तुटवडा भासतो आणि रुग्णाचे व नातेवाईकांचे प्रचंड हाल होतात. फॅमिली डॉक्टर जर सक्षम असेल तर तो रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासून थांबवू शकतो. खूप घाबरून जाऊ नये. थोडा धीर ठेवायचा, लक्षणे पाच दिवसात बरी होतात. लक्षणे असली, की कोरोनाच आहे असे समजून, रिपोर्ट आला नसेल तरी स्वतःला घरात कोंडून घ्यायच, व घरच्यांनी सुद्धा. घरात सुद्धा सर्वांनी मास्क वापरायचा, रुग्णाला डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर किंवा इतर मोठे आजार असतील तर मात्र विशेष काळजी घ्यावी. वाचा: मोफत लसीकरण होणार का? अजित पवारांनी दिले हे उत्तर अजून एक गोष्ट सांगायची राहिली. आपण कसा घरात ओवन, फ्रिज बसवला, एवढेच नव्हे तर ऑक्सि मीटर प्रत्येक घराघरात पोहोचला, तसाच आपल्या घरात एक नेब्युलायझर प्रत्येकाने घेऊन ठेवावा. आयुष्यभर खूप कामाला येईल. कारण यापुढे आपल्याला सतत दूषित दूषित हवेला सामोरं जावं लागणार आहे. नेब्युलायझरच्या भांड्यात  Methylene blue पावडरीचे वर सांगितल्याप्रमाणे बनवलेले solution एक ते दीड चमचा टाकून नाकाद्वारे तसेच तोंडाद्वारे फवारा घेणे. चांगले पाच ते सात मिनिटं असे करणे. कोरोना झालेल्या व्यक्तीने हे रोज सकाळी व संध्याकाळी करणे. सामान्य व्यक्तीने किंवा कोरोना पीडिताच्या घरातल्या व्यक्तीने हे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करणे. परंतु प्रत्येकाने नेब्युलायझरचा जो सिलिकॉनचा मास्क असतो तो धुवून वापरावा. ह्याने खूप चांगला फरक पडतो. हे करून बघितल्यावरच याचा प्रभाव किती चांगला आहे ते कळतं. सध्या रुग्णालयात सुद्धा हा प्रयोग केला जात आहे व यशस्वी होत आहे. ...तर फॅमिली डॉक्टर सुद्धा घरातल्या घरात पेशंटला बरा करू शकतो डॉ. शुभा राऊळ यांनी पुढे म्हटलं, मी पुन्हा आपल्याला सांगत आहे की अजिबात गांगरून न जाता धीटपणा दाखवला तर फॅमिली डॉक्टर सुद्धा घरातल्या घरात पेशंटला बरा करू शकतो. कारण पेशंट व त्याचे नातेवाईक खूप घाबरलेले आहेत असं  वाटलं तर फॅमिली डॉक्टर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा असा सल्ला देतात. त्यांचासुद्धा नाईलाज असतो. हे मी एवढ्या विस्ताराने लिहिते आहे, कारण मागील 15 दिवस अनेक रुग्णांचे व हतबल झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल मी पाहते आहे. मी परिस्थिती हाताबाहेर गेलेली पाहिलेली आहे. औषधांसाठी इथे-तिथे फिरणारे व ते ब्लॅकने कितीही रुपयाला घ्यायला तयार होणारे नातेवाईक बघितले. अशा वेळेला खूप Helpless वाटतं. मन अतिशय खिन्न होतं.. रुग्णालयात अनेक गोष्टींची कमतरता असल्याने डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाही. त्यामुळे कृपा करून संसर्ग होणारच नाही याची सर्वांनी काळजी घ्या. संसर्ग झालाच तरीसुद्धा घाबरून न जाता, वरील सूचनांचे पालन करा असं आवाहनही त्यांनी केलं.
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published: