दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलवर दगडफेक; महिलांमध्ये दहशत

दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलवर दगडफेक; महिलांमध्ये दहशत

या दगडफेकीत एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 5 ऑक्टोबर : दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान अज्ञातांकडून लोकलवर दगडफेक करण्यात आलीय. या दगडफेकीत एक महिला प्रवासी गंभीर जखमी झालीय. कांचन हाटले असं तरूणीचं नाव असून ती दिवा इथली रहिवासी आहे. या प्रकारामुळं लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये दहशत निर्माण झालीय. आता लोकलवर दगडफेक करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.

ठाणे रेल्वे स्थानकावरुन निघालेल्या लोकलवर दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या परिसरात अज्ञातांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत महिला प्रवाशी जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दगडफेकीमुळे प्रवाश्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

कांचन विकास हाटले असं जखमी झालेल्या तरुणीचं नाव आहे. ती दिवा परिसरात राहते. महिन्याभरापु्र्वीच तीने अंधेरीतली नोकरी सोडली आणि मुलुंडमधील एका खासगी कंपनीत नोकरी सुरू केली होती. नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर ती लोकलने घरी जात असताना, मुंब्रा दिवा रेल्वेस्थानकादरम्यान अज्ञातांनी दगडफेक केली. यातील दगड कांचन हिला लागल्याने ती जखमी झाली. दगडाचा मारांमध्ये तिचे दात तुटले.

लोकल डोंबिवली स्थानकावर पोहोचताच तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्या तुटलेल्या दातावर शस्त्रक्रिया केली. ज्या ठिकाणी दगडफेकीचा प्रकार घडला, तिथे यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडले आहेत. मात्र, यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार प्रवाश्यांनी बोलून दाखवली. या घटनेची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिसात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

 दोघांनी एका तरुणाला दगडांनी केली मारहाण, धक्कादायक घटना CCTVमध्ये कैद

First published: October 5, 2018, 6:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading