Home /News /mumbai /

कंगनाला मोठा धक्का, घरावरही चालणार हतोडा; BMC च्या बाजूने कोर्टाने दिला निकाल

कंगनाला मोठा धक्का, घरावरही चालणार हतोडा; BMC च्या बाजूने कोर्टाने दिला निकाल

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या बांद्रास्थित घरात अवैध बांधकाम करण्यात आल्याच्या पालिकेच्या नोटिशीवर कोर्टाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

मुंबई, 23 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिच्या बांद्रास्थित घरात अवैध बांधकाम करण्यात आल्याच्या पालिकेच्या नोटिशीवर कोर्टाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामळे आता दीड महिन्यांनंतर कंगनाच्या घरावर मुंबई महानगरपालिका हातोडा चालवू शकते. दिंडोशी कोर्टाने अवैध बांधकामावर शिक्कामोर्तब करून याचिकाकर्त्या कंगना रणौतला 6 आठवड्यांची मुदत दिली आहे. महापालिकेनंतर आता कोर्टानेही अवैध बांधकामावर शिक्कामोर्तब केल्याने कंगनाच्या अडचणीत वाढ झाली असून बॉलिवूड 'क्वीन'साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काय आहे प्रकरण? 2018 साली महापालिकेने कंगनाला तिच्या बांद्रास्थित घरात अवैध बांधकाम झाल्याची नोटीस दिली होती. मात्र कंगनाने पालिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी कोर्टाकडून स्थगिती आणली होती. मात्र आता दिंडोशी कोर्टाने हे बांधकाम अवैध असून दीड महिन्यानंतर तुम्ही ते तोडू शकता, असं म्हटलं आहे. 'मुंबईकरांनो, नाईट कर्फ्यूमध्येही तुम्ही रस्त्यावर फिरू शकता, फक्त...' विश्वास नांगरे पाटलांनी सांगितले नेमके नियम  दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कंगना विरुद्ध राज्य सरकार आणि मुंबई महापालिका हा वाद रंगत आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग तोडल्यानंतर कंगनाने यंत्रणेवर खरमरीत टीका केली होती. तसंच एकेरी शब्दांत उल्लेख करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता.
First published:

Tags: Kangana ranaut, Mumbai, Mumbai News

पुढील बातम्या