मोठी घडामोड.. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री

मोठी घडामोड.. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री

मुंबईतील राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. राजभवनात शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीकडून सातत्याने बैठकांचा सिलसिला सुरू होता. आज चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याची चर्चाही होती. अखेरच्या टप्प्यात सगळे ठरत असताना मात्र अचानक राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली. राजभवनात थेट मुख्ममंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. महाविकासआघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार होती मात्र त्याआधीच शनिवारी शपथविधीसोहळा पार पडल्याने अनेक सवालही उपस्थित होत आहेत. महिन्याभरापासून सुरु असलेला सत्तसंघर्षाचा तिढा अखेर सुटला आणि एक वेगळं समीकरण समोर आलं आहे.

महिनाभर नुसतं चर्चेचं गुऱ्हार चालू होतं मात्र त्यामधून कोणताही तोडगा निघत नव्हता. त्यामुळे स्थिर सरकार स्थापन कसं होणार हा प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला जी जबाबदारी दिली आहे ती निश्चितपणे चांगल्यापद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

अचानक आलेल्या राजकीय भूकंपामुळे मात्र अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. शिवसेना आणि काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केली का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली का? अजित पवार महाविकास आघाडीत होत असलेल्या चर्चांबाबत नाराज होते का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 23, 2019, 8:15 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading