Home /News /mumbai /

कोरोनामुळे 24 दिवसांपासून मुंबईकर महिलेचा मृतदेह चीनमध्ये अडकला, डॉक्टर मुलाने मोदींना लिहलं पत्र

कोरोनामुळे 24 दिवसांपासून मुंबईकर महिलेचा मृतदेह चीनमध्ये अडकला, डॉक्टर मुलाने मोदींना लिहलं पत्र

मुंबईच्या वांद्रे येथील दंतवैद्याने आपल्या आईचा मृतदेह परत मिळविण्यात मदत करण्यासाठी केंद्र सरकारला आवाहन केले आहे जेणेकरून लवकरात लवकर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जावे.

    मुंबई, 19 फेब्रुवारी : चीनमध्ये कोरोना विषाणू पसरल्यामुळे मुंबईच्या एका डेंटिस्टच्या आईचा मृतदेह अद्याप कुटूंबाला मिळाला नाही आहे. महिलेच्या मृत्यूला आता महिना होत आहे. पण चीनमध्ये कोरोना पसरल्यामुळे महिलेचा मृतदेह भारतात आणण्यासाठी अडचणी येत आहेत. यावर आईचा मृतदेह चीनमधून परत मिळवण्यासाठी डेंटिस्ट तरुणाने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. डेंटिस्ट पुनीत मेहरा (35) यांनी सांगितले की, बीजिंगमधील भारतीय दूतावासाने सोमवारी त्यांना माहिती दिली की, चीनमध्ये प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लोक आणि वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या आईचा मृतदेह पाठवण्याचे काम लांबणीवर पडलं आहे. मुंबईच्या वांद्रे येथील दंतवैद्याने आपल्या आईचा मृतदेह परत मिळविण्यात मदत करण्यासाठी केंद्र सरकारला आवाहन केले आहे जेणेकरून लवकरात लवकर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जावे. डेंटिस्टच्या म्हणण्यानुसार, 24 जानेवारीला ते आपल्या आईसह एअर चायना विमानात मेलबर्नहून बीजिंगमार्गे मुंबईकडे येत होते. त्याने सांगितले की, त्यांची आई नऊ तासाच्या उड्डाणानंतर शौचालयाला गेली होती. परंतु बर्‍याच वेळ परतल्यानंतरही त्या बाहेर आल्या नाही. मेहरा यांनी क्रू सदस्यांना याबाबत माहिती दिली. थोड्या वेळाने शौचालयाचे दरवाजे उघडले आणि त्याची आई बेशुद्ध अवस्थेत आढळली. पुनीत मेहरा यांनी सांगितले की, प्रवाशांमध्ये एक डॉक्टर आणि एक नर्स होती, त्यांनी क्रू सदस्यांसमवेत टीमद्वारे हृदयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि नंतर विमानाला चीनच्या झेंगझोंऊ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले गेले. परंतु तोपर्यंत त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. पुनीत मेहरा 7 फेब्रुवारीला भारतात परतले पण त्यांचा मृतदेह अद्यापही झेंगझोऊ प्रांतातील रुग्णलायात ठेवण्यात आला आहे. इतर बातम्या - पेग बनवण्यासाठी तरुणाने केलं 7 वर्षांच्या मुलाचं अपहरण, ग्लास भरला नाही तर... मेहरा यांनी यासंबंधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, परराष्ट्र मंत्रालय आणि बीजिंगमध्ये भारतीय राजदूताला पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले असून लवकरात लवकर आईच्या मृतदेहाची स्वदेशी परत घेण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. मेहरा म्हणाले की, '24 दिवसांहून अधिक काळ झाला आहे. आम्ही पूर्णपणे तुटलेले आहोत आणि अशा परिस्थितीत भावनिक तणावातून जात आहोत. '
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या