डोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच!

डोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच!

मुंबईतल्या डोंगरी परिसरात 4 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 13वर पोहोचली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै: मुंबईतल्या डोंगरी परिसरात 4 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 14वर पोहोचली आहे. मंगळवारी झालेल्या दुर्घटनेनंतर अजूनही ढिगारा काढण्याचे काम सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त  केली जात आहे. घटनास्थळी बुधवारी सकाळीही मदत आणि बचाव काम सुरु आहे. आतापर्यंत 23 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी एका लहान मुलासह 9 जणांना ढिगाऱ्याखालून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींवर जे.जे.रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबईतील डोंगरी भागात मंगळवारी सकाळी 11.40च्या सुमारास केसरबाई ही चार मजली इमारत कोसळली होती. जवळ जवळ 80-100 वर्ष जुनी असेलल्या या इमारतीत 15 कुटुंब राहत होती. या कुटुंबातील 40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ही इमारत धोकादायक असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले होते.NDRFने दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या 14वर पोहोचली आहे.

राष्ट्रपतींनी व्यक्त केले दु:ख

मुंबईत झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मुंबईतील दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी दु:ख झालो आहे. मृतांच्या कुटुंबींच्या दु:ख मी सहभागी असून जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.

या दुर्घटनेप्रकरणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आणि मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्वविकासाचे अडथळे दूर करण्यासंदर्भात ठोस कायदा करण्यांसंदर्भात चर्चा केली.

10 जणांचा जीव घेणारी इमारत कुणाची? सत्ताधारी आणि म्हाडाची टोलवाटोलवी

First published: July 17, 2019, 7:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading