Home /News /mumbai /

मुंबई इमारत दुर्घटना : उपचारादरम्यान 44 वर्षीय महिलेने सोडले प्राण

मुंबई इमारत दुर्घटना : उपचारादरम्यान 44 वर्षीय महिलेने सोडले प्राण

सदर घटनेत एकूण 20 व्यक्तींना दुखापत झालेली असून 16 व्यक्तींना के इ एम हॉस्पिटल आणि उर्वरित 4 व्यक्तींना मसिना हॉस्पिटल, मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मुंबई, 6 डिसेंबर : मुंबईत झालेल्या साराभाई इमारत दुर्घटनेतील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही 44 वर्षीय महिला या दुर्घटनेत गंभीर जखमी झाली होती. सदर घटनेत एकूण 20 व्यक्तींना दुखापत झालेली असून 16 व्यक्तींना के इ एम हॉस्पिटल आणि उर्वरित 4 व्यक्तींना मसिना हॉस्पिटल, मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मुंबईत सकाळी 7 वाजताच्या सुमारास साराभाई बिल्डिंग, गणेश गल्ली, लालबाग, मुंबई येथे दुसऱ्या मजल्यावरील 17 नंबर खोलीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती. मुंबई अ.दलाकडून 7.50 वाजताच्या सुमारास आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. घटनास्थळी मुंबई अ. केंद्राचे 2 फायर वाहन आणि 2 जम्बो वॉटर टँकर उपस्थित होते. के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे:- (प्रकृती गंभीर असलेल्या व्यक्ती) 1) श्री. प्रथमेश मुंगा (पु./ 27) 2) श्री. रोशन अंधारी (पु./ 27 वर्षे) 3) श्री. मंगेश राणे (पु./ 61 वर्षे) 4) श्री. महेश भुंग (पु./ 56 वर्षे) 5) श्री. ज्ञानदेव सावंत (पु./ 85 वर्षे) 6) श्रीमती सुशिला बांगर (स्री/ 62 वर्षे) (प्रकृती स्थिर असलेल्या व्यक्ती) 1) श्रीमती ममता मुंगा (स्री/ 48 वर्षे) 2) श्री. विनय शिंदे (पु./ 75 वर्षे) 3) श्री. करीम (पु./ 45 वर्षे) 4) कुमार ओम शिंदे (पु./ 20 वर्षे) 5) कुमार यश राणे (पु./ 09 वर्षे) 6) कुमार मिहीर चव्हाण (पु./ 20 वर्षे) मसिना हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या व्यक्तिंची नावे पुढीलप्रमाणे:- १) श्री. सुर्यकांत साठ (पु./ 60 वर्षे) २) श्री. प्रथमेश भुंग (पु./ 27 वर्षे) ३) श्रीमती वैशाली हिमांशु (स्री/ 44 वर्षे) ४) कुमारी त्रीशा (स्री/ 13 वर्षे) हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास नकार दिलेल्या व्यक्तींची नावे:- १) श्री. हिमांशू कहियार (पु./ 44 वर्षे) २) श्रीमती बिना अंबिका (स्री/ 45 वर्षे) दरम्यान, याबाबतची माहिती मुंबई आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Fire, Mumbai

पुढील बातम्या