उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

'येत्या 48 तासांत महाराष्ट्रासह गुजरातमध्ये वादळीवाऱ्यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल'

  • Share this:

मुंबई, 01 जून : उकाड्यानं हैरण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला. रविवारी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. तर सोमवारी सकाळी मुंबईत पावसाचं आगमन झाल्यानं मुंबईकर सुखावला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते.

केरळमध्ये मान्सून 48 तास आधीच दाखल झाल्याचा दावा स्कायमेटनं केला आहे. तर देशभरात हवामानात वेगानं बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे प. बंगालमधील अम्फान वादळानंतर आता आणखी एक मोठं वादळ येणार असल्याचं सांगितलं आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं चक्रीवादळाचा धोका मुंबईसह कोकणाला आहे.  पुढच्या 48 तासांत हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. सिंधुदुर्ग आणि कोकण किनारपट्टीवरून हे वादळ जाणार असून गुजरातच्या किनारपट्टीलाही धोका असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

अरबी समुद्रातून वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे हवामानात बदल होत आहेत. येत्या 48 तासांत महाराष्ट्रासह गुजरातमध्ये वादळीवाऱ्यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हे वाचा-आज पासून रेल्वे सुसाट, दररोज धावणार 200 गाड्या; पाहा वेळापत्रक!

हे वाचा-सावधान! 'हिका' चक्रीवादळामुळे कोकणात हाय अलर्ट

हे वाचा-लॉकडाऊन 5 मध्ये श्रीमंतांसाठी निर्णय तर गरीबांना सोडलं वाऱ्यावर, मोदींवर आरोप

First published: June 1, 2020, 7:50 AM IST

ताज्या बातम्या