निसर्ग चक्रीवादळापासून वाचण्यासाठी मुंबईकरांनी काय करावं? पालिकेने केलं विशेष आवाहन

निसर्ग चक्रीवादळापासून वाचण्यासाठी मुंबईकरांनी काय करावं? पालिकेने केलं विशेष आवाहन

मुंबईकर नागरिकांनीदेखील आवश्यक ती खबरदारी आपल्या स्तरावर बाळगावी, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 02 जून : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर दिनांक 03 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व उपाययोजना समन्वयाने करण्यात येत आहेत. मुंबईकर नागरिकांनीदेखील आवश्यक ती खबरदारी आपल्या स्तरावर बाळगावी, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केलं आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचं रूपांतर चक्रीवादळामध्ये झालं आहे. हे चक्रीवादळ 3 जूनला पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या कालावधीमध्ये वेगवान वारे वाहण्याची शक्यता असून समवेत जोरदार पाऊस देखील कोसळू शकतो. ही स्थिती लक्षात घेता महानगरपालिकेचा मुख्य नियंत्रण कक्ष आणि विभागवार नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सज्ज करण्यात आलं आहेत.

पोलीस चक्रावले, 2 मुलींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरला लग्न करण्याचा हट्ट

तटरक्षक दल, नौदल, मुंबई अग्निशमन दल यांच्यासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं सुसज्ज करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाकडून तातडीनं हाती घेण्यात आली आहे.

मुंबईतील सर्व 24 विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आपल्या विभागातील संभाव्य धोका पोहोचू शकणाऱ्या वसाहती तसंच सखल भागातील वसाहती निश्चित करून तिथल्या नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मच्छीमार व इतरांनी देखील समुद्रात जाऊ नये, समुद्रकिनार्‍यापासून लांब रहावं, झाड आणि खांब यांच्याखाली नागरिकांनी उभे राहू नये, वादळाच्या कालावधीमध्ये घराबाहेर पडू नये, अशी विनंती करण्यात येत आहे.

पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे, अतिवृष्टीसह 'निसर्ग' चक्रीवादळ घेणार रौद्र रुप

मुंबईतील मोठ्या औद्योगिक आस्थापना आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांनी आपली यंत्रणा व सामुग्री सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. मुंबईतील सर्व रुग्णालयांनी वीज जनित्र (जनरेटर) कार्यान्वित आहेत, याची दक्षता घेऊन वीजपुरवठा अखंड सुरू राहील, याची तजवीज करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, आवश्यक साधनं जवळ बाळगावीत आणि वैयक्तिक स्तरावर देखील खबरदारी घ्यावी, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

पुणेकरांनी आता चिंता सोडावी, कोरोनासंदर्भात भाजपने घेतला मोठा निर्णय

 संपादन - रेणुका धायबर

First published: June 2, 2020, 8:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading