S M L

#MumbaiBridgeCollapse या घटनेमुळे नाव पडलं 'कसाब'चा पूल

मुंबई हल्ल्यातला जिंवत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी कसाबने सीएसटीमध्ये येण्यासाठी या पुलाचा वापर केला.

Updated On: Mar 14, 2019 09:37 PM IST

#MumbaiBridgeCollapse या घटनेमुळे नाव पडलं 'कसाब'चा पूल

मुंबई 14 मार्च : मुंबईतला सर्वाधिक महत्त्वाचा आणि अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या CSMT जवळचा एक पूल गुरूवारी रात्री कोसळला. या ब्रिजचं दुसरं नाव आहे कसाबचा पूल . आज हाच पूल मृत्यूचा सापळा बनला. या दुर्घटनेत रात्री साडे नऊ वाजेपर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला  होता अशी माहिती प्रशासनाने दिली होती. तर जखमींची संख्या 38 वर गेली आहे.

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झाला. या हल्ल्यातला जिंवत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी कसाबने सीएसटीमध्ये गोळीबार केल्यानंतर तेथून टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीकडे परत येताना या पुलाचा वापर केला होता. या पुलावर त्याचा फोटोही घेतला गेला. अंधाधुंद गोळीबार करून करून तो पुलावरून खाली उतरला आणि टाईम्सच्या एका गल्लीतून कसाब आणि इतर दहशतवादी कामा हॉस्पिटलकडे गेले. त्यामुळे नंतर या पुलाला कसाबचा पूल असंच नाव पडलं.

नेमकं काय झालं?


दक्षिण मुंबईतल्या या भागात संध्याकाळी अतिशय गर्दी असते. महत्त्वाची ऑफिसेस या भागात असल्याने सगळ्यांची गर्दी ही सीएसटी स्टेशनकडे असते.

हा पूल कोसळल्यामुळे प्रचंड धावपळ उडाली. पुलाखाली काही गाड्याही दबल्या गेल्या आहेत.

NDRF घटनास्थळी

Loading...

मेट्रोचं कामही या भागात सुरू असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत असतो. या पुलावर जे लोक चालत होते ते सर्व जण खाली कोसळले.

जखमींना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू केलं आहे. NDRF च्या पथकानेही घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदत कार्याला सुरूवात केली.

मुंबईत पूल कोसळला, घटनास्थळावरचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2019 09:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close