कसारा इगतपूरी दरम्यान अंत्योदय एक्स्प्रेस घसरली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कसारा इगतपूरी दरम्यान अंत्योदय एक्स्प्रेस घसरली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची कसाऱ्याच्या पुढील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै: मध्य रेल्वेची कसाऱ्याच्या पुढील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा-इगतपूरी दरम्यान अंत्योदय एक्स्प्रेस घसरल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंत्योदय एक्स्प्रेस ही गाडी घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनिसकडे येणारी गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस कसारा-इगतपूरी दरम्यान घसरल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले. ही घटना मध्य रात्री 3.50च्या सुमारास घडली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण यामुळे मध्य रेल्वेची अप आणि मध्य लाईन विस्कळीत झाली आहे. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या लोकल सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

सेमीफायनलला धोनी मुद्दामहून बाद झाला, स्टार क्रिकेटरच्या वडिलाचा गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 07:03 AM IST

ताज्या बातम्या