मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Drug bust: Cordelia क्रूझवर धाड प्रकरणात NCB ची मुंबईत मोठी कारवाई, परदेशी नागरिकाला अटक

Mumbai Drug bust: Cordelia क्रूझवर धाड प्रकरणात NCB ची मुंबईत मोठी कारवाई, परदेशी नागरिकाला अटक

Cordelia क्रूझवरील धाड प्रकरणात मोठी घडामोड

Cordelia क्रूझवरील धाड प्रकरणात मोठी घडामोड

Mumbai Drug bust news updates: क्रूझवरील धाड प्रकरणात एनसीबीने मुंबईत रात्री एक कारवाई करुन परदेशी नागरिकाला अटक केली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 7 ऑक्टोबर : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर धाड टाकत एनसीबीने (NCB raid at Cordelia Cruise) कारवाई करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान यालाही अटक (Aryan Khan arrest) करण्यात आली आहे. या प्रकरणात एनसीबीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने मुंबईतील वांद्रे परिसरातून एका परदेशी नागरिकाला बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून ड्रग्जही जप्त करण्यात आले आहे. (Foreign national arrested from Mumbai in cruise ship raid case)

न्यूज एजन्सी एएनआयने या संदर्भात ट्विट करत माहिती दिली की, क्रूझवरील हल्ला प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई म्हणजे एनसीबीने एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून mephedrone (MD) जप्त करण्यात आले आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातून रात्री त्याला अटक करण्यात आली आहे. क्रूझवरील धाड प्रकरणातील ही आता 18वी अटक झाली आहे.

नवाब मलिकांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी 6 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईबद्दल धक्कादायक खुलासे केले. शनिवारी एनसीबी (NCB) ने CISF कडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर (Cruise Ship) छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूडचा स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना अटक केली. एनसीबीनं केलेल्या या कारवाईसंदर्भात मलिक यांनी पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवून गौप्यस्फोट केला आहे. 'आर्यन खानची अटक ही बनावट आहे. गेल्या एक महिन्यापासून याबद्दल पत्रकारांना माहिती प्रसारित केली जात होती की पुढील लक्ष्य अभिनेता शाहरुख खान आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

वाचा : नवाब मलिकांच्या आरोपाने NCB सापडली कोंडीत, म्हणे, भानुशाली आणि गोसावी तर साक्षीदार!

'जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात आहे. आणि याच व्यक्तीसोबत आर्यन खानचा एक सेल्फी फोटो आहे. त्यानंतर एनआयएनं दिल्लीतल्या एका अधिकाऱ्याच्या माहितीच्या आधारावर माहिती दिली की, NCB नं सांगितलं की हा व्यक्ती आमचा अधिकारी नाही. अरबाज मर्चंटचा देखील एक व्हिडिओ एनआयएनं रिलीज केला. यात लाल शर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे. हे दोन्ही फीड एनआयएनं रिलीज केलेत. या व्हिडिओत पहिला व्यक्ती के. पी. गोसावी आणि दुसरा व्यक्ती मनीष भानुशाली आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

या व्यक्ती भाजपचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा आणि आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळे मलिकांनी काही सवाल उपस्थित केलेत. एनसीबी आणि भाजपचे काय संबंध आहेत हे एनसीबीनं सिद्ध करावं, असं आव्हानच मलिकांनी दिलं आहे.

First published:

Tags: Crime, Mumbai