Home /News /mumbai /

NCB ला 3 दिवसाआधीच मिळालेली माहिती; हा कोड वर्ड वापरुन आयोजित केलेली क्रुझवरील ड्रग्ज पार्टी

NCB ला 3 दिवसाआधीच मिळालेली माहिती; हा कोड वर्ड वापरुन आयोजित केलेली क्रुझवरील ड्रग्ज पार्टी

ड्रग्स पार्टी सुरू होताच एनसीबीने धडक कारवाई सुरू केली. यात बॉलिवूड कलाकारांनाही (Bollywood Celebrities) ताब्यात घेण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय एका आयपीएस अधिकाऱ्यालाही (IPS Officer) ताब्यात घेतलं गेलं आहे

मुंबई 03 ऑक्टोबर : मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर (CRUISE SHIP) सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीचा (Drugs Party in Ship) एनसीबीने पर्दाफाश (NCB Raid) केला आहे. या क्रुझवर फॅशन शोचे (Fashion Show) आयोजन करण्यात आले होते. हे क्रुझ गोव्याला (goa) निघाले होते. ड्रग्स पार्टी सुरू होताच एनसीबीने धडक कारवाई सुरू केली. यात एक बॉलिवूड कलाकारांनाही (Bollywood Celebrities) ताब्यात घेण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय एका आयपीएस अधिकाऱ्यालाही (IPS Officer) ताब्यात घेतलं गेलं आहे. या सर्वांकडे अंमली पदार्थ सापडले. मुंबईत फॅशन शोच्या नावाखाली ड्रग्स पार्टी, बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी जाळ्यात यात ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती हा अॅडिशनल सीपी दर्जाचा अधिकारी आहे. पार्टी सहभागी झालेल्यांनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंडरविअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईत अंमली पदार्थ आणले होते. अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली. या माहितीच्या आधारे एनसीबीनं छापा टाकून एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. NCB ला तीन दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती मिळाली होती. कोड वर्ड वापरुन ही पार्टी आयोजित केली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबईत क्रुझवर ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश, मोठ्या अभिनेत्याचा मुलगा ताब्यात या प्रकरणाबाबत बोलताना NCB च्या समिर वानखेडे यांनी सांगितलं, की अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 22 पैकी आठ जणांची चौकशी सुरू आहे. अद्याप एकालाही अटक केलेली नाही. आज कोणालाही कोर्टात हजर केलं जाणार नाही. हे प्रकरण किचकट आहे. एका बड्या अभिनेत्याच्या मुलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे, त्याची चौकशी सुरू आहे. आयपीएस अधिकाऱ्याचीही चौकशी सुरू असून या चौकशीत अद्याप काही समोर आलेलं नाही. समिर वानखेडे सकाळी 8 वाजता NCB कार्यालयात येणार आहेत
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Drugs, Mumbai, NCB

पुढील बातम्या