मुंबई, 08 नोव्हेंबर: मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांची नुकतीच पत्रकार परिषद (press conference)पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काशिफ खानच्या आमंत्रणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. तसंच महाराष्ट्र सरकारला पाडण्याची आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे.
मी काशिफ खानला ओळखत नसल्याचं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं आहे. काशिफनं मला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. पण मी पार्टीला गेलो नाही. क्रूझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही षडयंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे मला माहीत नाही. त्याचा तपास एजन्सीने करावं, असं अस्लम शेख यांनी म्हटल आहे.
Being a minister, I get invited to many events & parties. I was invited to the cruise party by one Kashiff Khan. I don't know him personally & I also don't have his contact number....If someone has any evidence, then they should bring it forward: Maharashtra minister Aslam Shaikh pic.twitter.com/yOZp0BjYQy
— ANI (@ANI) November 8, 2021
शाहरूखच्या मुलाच्या प्रकरणात काल नवाब मलिक यांनी सांगितलं की मला त्या क्रूजवर आमंत्रण दिलं होतं. मी पालक मंत्री आहे त्यामुळे मला कुणीही निमंत्रण देते.मला दिवसभरात शेकडो लोक निमंत्रण देतात. जिथे मला जायचं नाही तिथली माहिती मी घेत नसल्याचं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं आहे.
काशिफनं मला माहिती नाही किती वेळा फोन केला. मला कुणीही बोलावतो त्याचाच तो भाग होता. काशिफने मला फोन केला मी त्यांच्याशी बोललो असे मला आठवत नाही, असं ही ते म्हणालेत.
हेही वाचा- तुम्हालाही Social Media वर सतत निगेटिव्ह स्टोरी वाचण्याची सवय लागलीय का? मग वेळीच व्हा सावध
मी काशिफशी कधीही बोललो नाही. मला आठवते तोपर्यंत मला त्याने बोलावले होते. पण असे मला अनेक लोक निमंत्रण देतात. माझा मोबाईल पीएकडे असतो. तो एका ठिकाणी मला भेटला होता. तो तिथे कसा आला मला माहीत नाही. त्याने मला भेटून पार्टीचं निमंत्रण दिलं होतं, असं अस्लम शेख यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
पुढे अस्लम शेख यांनी म्हटलं की, मी पालकमंत्री आहे. त्यामुळे अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणे मला या पार्टीचंही आमंत्रण होतं. या प्रकरणात षडयंत्र होतं की नाही याचा एजन्सी तपास करत आहे.
हेही वाचा- पुणे: क्रिकेटच्या चेंडूवरून पेटला वाद; आरोपींनी मुलीला घराबाहेर काढत केलं विकृत कृत्य
मला काही माहिती असती मी त्यावेळीच दिली होती. हे आमच्या सरकारचे काम नाही. आम्ही त्या क्रुजला परवानगी देत नाही. माझ्या विभागाने परवानगी दिली नाही, असंही शेख यांनी म्हटलं आहे. पण क्रूझ चालू नये असे मला वाटत नाही. पण तुम्ही मोठ्या लोकांना पकडा लहान मुलांना पकडून काय मिळवले, असा सवालही शेख यांनी उपस्थित केला आहे.
ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील मंत्र्याला अडकवण्याचा प्लॅन?: नवाब मलिक
काल क्रूझ पार्टीवर राज्यातील कॅबिनेट मंत्र्याला सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. इतकेच नाही तर मंत्र्यांच्या मुलांनाही क्रूझवर पार्टीसाठी नेण्याचा प्लॅन होता. मंत्र्यांना क्रूझ पार्टीवर बोलावून अडकवण्याचा प्लॅन होता का? असा सवालही नवाब मलिकांनी उपस्थित केला.
मुंबईतील तो मंत्री कोण?
नवाब मलिक यांनी म्हटलं, क्रूझवर जी केस बनवण्यात आली त्यात एका पेपर रोलला सीज करण्यात आलं आहे. त्याचं नाव आहे Namas Cray. या पेपर रोलमधून ड्रग्ज दिलं जात असल्याचं बोललं जात आहे. या पेपर रोलमध्ये ड्रग्ज होते म्हणून सीज केले गेले तर या प्रकरणात त्याच्या मालकाला का अटक जाली नाही? या मालकाच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. काशीफ खान हा समीर वानखेडेचा मित्र आहे. त्या दिवशी तो पार्टीत नाचत होता. त्याला अटक का करण्यात आली नाही?
हेही वाचा- जादा Stress वाढल्यावर नेमकं काय करावं? निगेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचे हे आहेत सोपे उपाय
हाच काशीफ आमच्या सरकारमधील मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही क्रूझ पार्टीवर येण्यासाठी फोर्स करत होता. मंत्रिमंडळातील नेत्यांच्या मुलांनाही हा व्यक्ती पार्टीला येण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याला का सोडून देण्यात आलं. एका षडयंत्राच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा प्लॅन होता का? अस्लम शेख यांना क्रूझवर पार्टीसाठी नेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती मात्र, ते गेले नाहीत असंही नवाब मलिकांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nawab malik, NCB