मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /किरण गोसावीनं खंडणी वसुलीसाठी आखला होता मोठा प्लान, मुंबई पोलीस SIT तपासात झाला खुलासा

किरण गोसावीनं खंडणी वसुलीसाठी आखला होता मोठा प्लान, मुंबई पोलीस SIT तपासात झाला खुलासा

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी (Mumbai cruise drugs case) मोठी बातमी समोर येत आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी (Mumbai cruise drugs case) मोठी बातमी समोर येत आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी (Mumbai cruise drugs case) मोठी बातमी समोर येत आहे.

मुंबई, 09 नोव्हेंबर: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी (Mumbai cruise drugs case) मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) या प्रकरणी किरण गोसावीवर (Kiran Gosavi) गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. सध्या मुंबई पोलिसांची एसआयटी (Mumbai Police SIT) या प्रकरणी वसुलीच्या आरोपांचा तपास करत आहे. यात एनसीबी (NCB) सह वैयक्तिक पंचांवर वसुलीचे आरोप लावण्यात आले आहेत. दरम्यान या तपासात काही लोकांनी एनसीबीच्या नावाचा वापर करत वसुली केल्याचं एसआयटीच्या निदर्शनास आलं आहे. प्रभाकर साईलनं मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवला होता. त्यावेळी त्यानं आपल्या जबाबात याबद्दलची माहिती पोलिसांनी दिली होती.

दरम्यान या प्रकरणातील पंच किरण गोसावीवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळतेय. तसंच सॅम डिसूजावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे. या दोघांवरही मुंबई पोलिसांकडून खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल. प्रभाकर साईल यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.

हेही वाचा- पुण्यातल्या अग्नितांडवाचा Live Video, मध्यरात्री फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग

मुंबई पोलीस SIT चौकशी मध्ये मोठा खुलासा

किरण गोसावीनं स्वतःची ओळख NCBचा अधिकारी म्हणून सांगितली होती, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे. गोसावीनं ही ओळख पूजा ददलानीला सांगितली होती, असं समजतंय. त्यानं पैसे उकळण्यासाठी अशी खोटी ओळख दिली. मात्र यात कोणत्याही NCB अधिकाऱ्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग तुर्तास तरी चौकशीत आढळून आला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली आहे.

पूजा ददलानीचा जबाब खूप महत्त्वाचा

मुंबई पोलिसांनी पूजा ददलानीला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र पूजा यांनी प्रकृतीचं कारण देत मुंबई पोलिसांकडे वेळ मागितला आहे. दरम्यान पूजा ददलानी येत्या शुक्रवारी चौकशीला येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या या चौकशीत आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी मुंबई पोलीस एसआयटी टीम NCB अधिका-यांची देखील चौकशी केली जाणार आहे.

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीची गाडी CCTV मध्ये कैद

तीन दिवसांपूर्वी खंडणीचा आरोप झाल्याप्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पथकाला महत्त्वाचं सीसीटीव्ही फूटेज (Mumbai Police get important cctv) मिळालं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या एसआयटी पथकाला मिळालेलं हे सीसीटीव्ही फूटेज लोअर परिसरातील आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिची निळ्या रंगाची मर्सिडीज कार दिसत आहे. ज्या ठिकाणी ही मर्सिडीज कार दिसत आहे त्याच ठिकाणी 25 कोटींची खंडणीची डील झाली असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा- दहशतवाद्यांचं टार्गेट ठरताहेत सामान्य नागरिक, काश्मीरमध्ये आणखी एकाची गोळ्या झाडून हत्या

सीसीटीव्ही फूटेजमध्ये निळ्या रंगाची मर्सिडीज दिसत आहे. त्यासोबतच शेजारी एक इनोव्हा कारही दिसत आहे. ही इनोव्हा पंच किरण गोसावी याची असल्याचाही पोलिसांना संशय आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे आता मुंबई पोलीस तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Mumbai police, NCB