मुंबई (विजय वंजारा), 04 डिसेंबर : मुंबईच्या कांदिवली पश्चिम काढली गोराई भागात आरपीआय कार्यकर्त्यांना रहिवाशांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे चारकोप परिसरात भीतीचा वातावरण पसरले आहे. दरम्यान रहिवाशांनी मारहाण केलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. काही रहिवाशांच्या विरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश मधुकर साळवे, मुंबई हे डिंगेश्वर तलावच्या मुख्यगेटजवळ, चारकोपगाव येथे त्यांच्या काही RPI कार्यकर्त्यांसोबत गेले होते. तेथील निष्कासीत झालेल्या झोपडपट्टीत राहणारे इसम नामे छोटू व इतर 5-6 पुरूष व काही महीला यांनी काही मंडळी जमवून आरपीआय कार्यकर्त्यांना मारहाण केली.
#मुंबई : चारकोप रहिवाशीकडून RPI च्या कार्यकर्त्याला मारहाण pic.twitter.com/Q1GYnS7B1v
— News18Lokmat (@News18lokmat) December 4, 2022
हे ही वाचा : 'शिवरायांचा जन्म हा कोकणामध्ये झाला होता' भाजप आमदार प्रसाद लाड बरगळले
मागच्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील कांदळवन कत्तलीची जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई येथे तक्रारीचा राग मनात धरून फिर्यादी व साक्षीदार महीला निता जैसवार हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना शिवीगाळ दमदाटी करत बघून घेण्याची धमकी ही देण्यात आल्याची माहिती आरोपींनी दिली. या विरुद्ध चारकोप पोलीस ठाण्यात 323, 143, 147, 149, 504, 506 नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मारहाण करून आरोपींनी पलायन केले आहे.
पुण्यातही धक्कादायक प्रकार समोर
पुण्यात प्रेमप्रकरणाच्या घटना वाढत आहेत यातून एकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथे घटना घडली आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे 1 डिसेंबरच्या रात्री त्या मुलाचे अपहरण केले होते. त्याला रात्रभर मारून सोडून देण्यात आले आहे. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणाच्या संशयातून चौघांनी एका तरुणाचे अपहरण केले होते. त्याला रात्रभर खोलीत डांबून जबरदस्तीने दारू पाजत लाथाबुक्क्यांसह बांबू, स्टिलच्या पाईपाने डोक्यात, हातावर मारून काचेची बाटली डोक्यात फोडली. यामध्ये त्या तरूणाला जबर मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या कानातून रक्तस्त्राव झाला आहे.
हे ही वाचा : सोलापुरातील त्या लग्नाला वेगळंच वळण; जुळ्या बहिणींशी विवाह करणं तरुणाला भोवणार? पोलिसांत पोहोचलं प्रकरण
त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तन्मय दीपक पाचरणे (वय 20, रा. पाचरणे आळी, वाघोली), वेदांत महादेव गपाट (वय 19, रा. शंकरनगर, खराडी) या दोघांना अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Mumbai