Home /News /mumbai /

खुनाचा आरोप असलेला गुन्हेगार 35 वर्षांनी सापडला तावडीत; मुंबई पोलीसांच्या नाकासमोर 20 वर्षं राहायचा!

खुनाचा आरोप असलेला गुन्हेगार 35 वर्षांनी सापडला तावडीत; मुंबई पोलीसांच्या नाकासमोर 20 वर्षं राहायचा!

24 व्या वर्षी त्याने साथीदाराच्या मदतीने एकाचा खून केला होता. त्यावेळी त्याला अटकही झाली होती. त्यानंतर जामीनावर सुटलेला गुंड आता वयाच्या 59 व्या वर्षी सापडला आहे.

मुंबई, 27 जुलै: तब्बल 35 वर्षं गुंगारा देत असलेल्या गुंडाला पकडण्यात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलिसांना (Trombay Police) अखेर यश आलं आहे. 1984 सालच्या एका खून आणि दंग्याप्रकरणी (Murder & Rioting) तो पोलिसांना हवा होता. प्रकाश मुरलीलाल रतन (Prakash Muralilal Ratan) ऊर्फ पक्या असं त्याचं नाव असून, तो आता 59 वर्षांचा आहे. या काळात त्याने नाव बदललं, राहण्याची ठिकाणंही बदलली. या, तसंच अन्य अनेक कारणांनी पोलीस त्याला पकडू शकले नव्हते; मात्र गेल्या आठवड्यात त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिस यशस्वी झाले. इंडियन एक्स्प्रेसने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ट्रॉम्बे पोलिस स्टेशनमधल्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, 1984मध्ये प्रकाश शिवाजी नगरमधल्या (Shivajinagar) बैंगनवाडी (Bainganwadi) परिसरात राहत होता. तो गुंड प्रवृत्तीचा होता. परिसरातल्या अन्य एका गुंडाशी त्याचा वाद झाला. तो गुंड शिवसेनेचा कार्यकर्ताही होता. या वादातून प्रकाश आणि त्याच्या साथीदाराने त्या गुंडाचा भोसकून खून केला. त्या वेळच्या ट्रॉम्बे पोलिस स्टेशनमध्ये त्याबद्दलची तक्रार दाखल झाली. खून आणि दंग्याप्रकरणी त्याला आणि साथीदाराला अटक झाली; मात्र प्रत्येक सुनावणीवेळी कोर्टात हजर राहण्याच्या अटीवर त्याला दीड वर्षाने जामीन मिळाला; मात्र तो उपस्थित न राहिल्याने त्याला फरारी घोषित करण्यात आलं. धक्कादायक! मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. पहिल्यांदा त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला; मात्र त्याने त्यांच्याशी संपर्क ठेवला नव्हता. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागला नाही. बैंगनवाडीतल्या एका ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना कळलं, की तो फुलांच्या माळा करून विकण्याच्या व्यवसायात आहे. तसंच, कफ परेड भागात तो त्याच्या मुलासह राहत असल्याचं आपण ऐकल्याचंही त्याने सांगितलं. कफ परेड भागातल्या आंबेडकर नगर झोपडपट्टीत त्याचं 20 वर्षांहून अधिक काळ वास्तव्य होतं. त्यानंतर स्थानिक खबरे आणि अन्य पोलिस स्टेशन्समधले पोलिस आदींच्या साह्याने पोलिस त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचण्यात यशस्वी झाले. त्याच्याकडून मिळालेल्या पॅनकार्डवर त्याचं नाव प्रकाश वाल्मिकी असं होतं. त्याने नाव बदलल्यामुळे पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. अटकेनंतर प्रकाशला कोर्टात हजर करण्यात आलं असून, त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर वर्षभरात 'इतक्या' वाहनांनी केलं वेगमर्यादेचं उल्लंघन पुन्हा अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्रकाशच्या चौकशीवेळी त्याने दिलेल्या माहितीनुसार, तेव्हा जामीन मिळाल्यानंतर प्रकाश विक्रोळीला स्थलांतरित झाला. तिथे त्याने लग्न केलं आणि तिथल्या पाच वर्षांच्या वास्तव्यात त्याला मुलगाही झाला. त्यानंतर काही वर्षं तो कोकणात राहत होता आणि नंतर तो पुन्हा मुंबईत येऊन कफ परेडमधल्या आंबेडकर नगर परिसरात राहत होता. कफ परेड (Cuff Parade) पोलिस स्टेशनच्या समोरच हा भाग असूनही तिथे तो राहत होता.

तुमच्या शहरातून (मुंबई)

First published:

Tags: Mumbai, Murder

पुढील बातम्या