कांदिवलीत नग्न फोटो काढून 16 वर्षाच्या मुलाला केलं ब्लॅकमेल

कांदिवलीत नग्न फोटो काढून 16 वर्षाच्या मुलाला केलं ब्लॅकमेल

एका मुलाचे नग्न फोटो पाठवून आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन 16 वर्षाच्या मुलाला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी 4 किशोरवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : एका मुलाचे नग्न फोटो पाठवून आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन 16 वर्षाच्या मुलाला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी 4 किशोरवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. एप्रिल महिन्यात बोरिवलीला आपल्या मित्रांसोबत जेवणासाठी गेला असता त्याने काही मुलांनी जबरदस्ती करत नग्न फोटो काढले आणि त्याला ब्लॅकमेल करत होते.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जेवण झाल्यानंतर तो मुलगा आणि त्याचा मित्र कांदिवलीला गेले. ठरल्याप्रमाणे ते त्यांच्या स्पॉटवर पोहचले तेव्हा काही मुलं तिथे आधीपासूनच उभी होती. त्या मुलांनी आधी मारहाण केली आणि त्या मुलाला कपडे काढण्यास सांगितलं. धमकी दिल्यामुळे त्याने कपडे काढले आणि लगेच त्यातल्या काहींनी त्याचे नग्न फोटो काढले. काहींनी तर व्हिडिओही काढला.

VIDEO : सांगलीत पोलीस कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने वार, जागीच मृत्यू

त्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी त्याला फोन आला. त्यात व्हिडिओ आणि फोटो डिलीट करण्यासाठी त्या मुलांकडून 600 रुपयांची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे पीडित मुलाने पैसेही दिले. त्यानंतर मे महिन्यात आरोपी मुलांनी पुन्हा फोन केला आणि 10 हजार रुपयांची मागणी केली. पीडित मुलाने गळ्यातली सोन्याची चैन विकली आणि पैस दिले. त्यानंतर पुन्हा एकादा या आरोपींकडून पीडित मुलाकडे 5 हजार रुपयांची मागणी केली. पण त्यावेळी या सगळ्याला वैतागूण त्याने हा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला.

यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी कांदिवली पोलीस स्थानकात याची तक्रार केली आणि तपासानंतर पोलिसांनी त्या 4 किशोरवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा...

वाशीच्या एमजीएम रुग्णालयाची सिस्टीम हॅक, बदल्यात हॅकरने मागितले...!

Happy Birthday Priyanka Chopra: प्रियांका चोप्राच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

श्रेयस तळपदे झाला तीन मुलांचा बाप

First published: July 18, 2018, 10:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading