Home /News /mumbai /

मुंबई पोलिसात मोठ्या घडामोडी, क्राईम ब्रांचच्या तब्बल 86 अधिकाऱ्यांची बदली

मुंबई पोलिसात मोठ्या घडामोडी, क्राईम ब्रांचच्या तब्बल 86 अधिकाऱ्यांची बदली

Mumbai crime branch : सचिन वाझे अटक प्रकरणाच्या (Sachin Vaze Arrest) पार्श्वभूमीवर या हालचाली केल्या गेल्याचं बोललं जात आहे.

    मुंबई, 23 मार्च : मुंबई पोलिसात मोठे फेरबदल झाले असून तब्बल 86 अधिकाऱ्यांच्या विविध विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत. नियमित प्रशासकीय कारणांतून या बदल्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत असलं तरीही सचिन वाझे अटक प्रकरणाच्या (Sachin Vaze Arrest) पार्श्वभूमीवर या हालचाली केल्या गेल्याचं बोललं जात आहे. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये फक्त क्राईम ब्रांचच्या 65 अधिकाऱ्यांचा समावेश असून PSI, API आणि वरिष्ठ PI दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसंच अनेक अधिकाऱ्यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचच्या CIU युनिटचे एपीआय ज्यांची सचिन वाझे प्रकरणात एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती त्या रियाज काझी यांचीही बदली करण्यात आली होती. मुंबई पोलिसात उलथापालथ आणि सचिन वाझे मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुंबईत सापडलेली स्फोटकं याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्याकडून नवनवे खुलासे होत आहेत. मुंबई क्राईम ब्रांचमध्ये सचिन वाझे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे वाझे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करताना पोलीस दलातील इतरही अधिकाऱ्यांची मदत घेतल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवरच बदल्यांच्या रुपाने क्राईम ब्रांचमध्ये झालेली उलथापालथ म्हणूनच चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्तांनंतर सर्वाधिक अधिकार सचिन वाझे यांना दिले होते, असा आरोप काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Mumbai crime branch, Mumbai police

    पुढील बातम्या