मुंबई, 15 जून : दिंडोशी इथल्या कोर्टाच्या इमारतीत आज एक विचित्र घटना घडली. एका 19 वर्षाच्या आरोपीला कोर्टापुढे हजर राहण्यासाठी पोलीस घेऊन जात असतानाच त्यानं पोलिसांना गुंगारा देत थेट इमारतीच्या गॅलरीतून उडी मारली. आत्महत्या करणाऱ्या या आरोपीचं नाव विकास संतोष पवार असल्याचं समजतं.
विकास पवार हा मुंबईचाच राहणारा होता. 19 वर्षाच्या या तरुणावर लहान मुलांवर अत्याचार केल्याचा आरोप होता. शिवाय इतरही अनेक तक्रारी या तरुणाविरोधात होत्या. पश्चिम उपनगरातल्या दिंडोशी इथल्या सत्र न्यायालयात त्याची सुनावणी होणार होती. पोलिसांनी विकासला नुकतंच ताब्यात घेतलं होतं. तो पोलीस कोठडीत होता. न्यायालयात त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संदर्भातली सुनावणी दुपारी 4.15 वाजता होणार होती. दिंडोशी पोलीस आरोपी विकास पवारला घेऊन कोर्टात हजर होण्यासाठी नेत होते. पण तेवढ्यात पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेत विकास पळत सुटला आणि त्याने थेट कोर्टाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली.
धक्कादायक : महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळलं
पोलिसांनी तातडीने त्याला जवळच्या शताब्दी रुग्णालयात नेलं. पण तिथे नेतानाच त्याची प्रकृती गंभीर होती, असं पोलीस म्हणाले. रुग्णालयात उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
काय करावं या पाकिस्तानचं ? 'फेसबुक लाइव्ह'मध्ये मांजर झाले मंत्री
विकासवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. Protection of Children from Sexual Offences Act अर्थात 'पोक्सो'खेरीज अन्य काही गैरवर्तनाच्या तक्रारीही त्याच्या विरोधात पोलिसांत दाखल झाल्या होत्या. या सर्व केसेसची सुनावणी कोर्टात सुरू होती. पोसीस तपासही अद्याप पूर्ण झालेला नव्हता. त्याअगोदरच या आरोपीनं आत्महत्या केली.
Mumbai: A man who was arrested under POCSO Act died after he jumped off the 6th floor of Dindoshi Sessions Court in an attempt to flee, earlier today. #Maharashtra
— ANI (@ANI) June 15, 2019
आरोपी विकास पवारच्या मनावर परिणाम झाला होता का, तो मनोरुग्ण होता का किंवा नैराश्याखाली होता याबाबत काही माहिती मिळालेली नाही.
ही बातमी अपडेट होत आहे.
VIDEO : उदयनराजे आणि रामराजेंच्या वादात शिवेंद्रराजेंचीही उडी, म्हणाले...