Home /News /mumbai /

मोठी बातमी ! मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली शरद पवारांची भेट; केतकी चितळे प्रकरणावर चर्चा?

मोठी बातमी ! मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली शरद पवारांची भेट; केतकी चितळे प्रकरणावर चर्चा?

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली शरद पवारांची भेट; केतकी चितळे प्रकरणावर चर्चा?

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली शरद पवारांची भेट; केतकी चितळे प्रकरणावर चर्चा?

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.

    मुंबई, 19 मे : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली. वाय बी चव्हाण सेंटर येथे संजय पांडे आणि शरद पवार यांच्यात भेट झाली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था याच्या संदर्भात भेटीत चर्चा झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणावरही चर्चा झाली असल्याचं वृत्त समोर येत आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत एक आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केतकी चितळे हिच्या विरोधात तक्रार दाखल केल्यावर तिला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी केतकी चितळेची पोलीस कोठडी काल (18 मे) संपल्यानंतर तिला पुन्हा ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ठाणे क्राईम ब्रांचने केतकीवर दाखल गुन्ह्यांत आणखी एक कलम वाढवले आहे. आयटी अॅक्ट कलम 66 नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे क्राईम ब्रांचने केतकी चितळे हिची वाढीव पोलीस कोठडी न मागितल्याने ठाणे सत्र न्यायालयाने तिला थेट न्यायालयीन कोठडी सुनावली काय आहे नेमकं प्रकरण? अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर केतकीला नवी मुंबईतून पोलिसांनी अटक केली. केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ? अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Mumbai, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या