मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Coronavirus : मुंबईत आज नवे 204 कोरोना पॉझिटिव्ह, 11 जणांचा मृत्यू; बाधितांचा आकडा 1753 वर

Coronavirus : मुंबईत आज नवे 204 कोरोना पॉझिटिव्ह, 11 जणांचा मृत्यू; बाधितांचा आकडा 1753 वर

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोनामुळे आतापर्यंत मुंबईत 111 जणांचा मृत्यू झाला आहे.

    मुंबई, 14 एप्रिल : देशभरात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसेंदिवस वाढत असून मुंबईत (Mumbai) आतापर्यंत मृतांचा आकडा शंभरीपार गेला आहे. आज मुंबईत 204 नवे कोरोनाबाधित (Covid - 19) रुग्णांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 1753 वर पोहोचला आहे. सध्या मुंबईतील रुग्णालयांमध्ये 5118 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आलं असून आज 385 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.  आज 11 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 111 पर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे आज 23 जण रुग्णालयातून बरे होऊन गेल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आतापर्यंत कोरोनाच्या संकटातून 164 जण बरे झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मेपर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढवल्याची घोषणा केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातही मुंबई कामानिमित्त आलेल्या मजुरांकडून गावी जाण्याची मागणी केली जात आहे. आज वांद्र्यात मोठ्या संख्येने मजूर एकत्र जमा झाले होते. त्यानंतर पुन्हा मुंबईत कोरोनाची भीती व्यक्त केली जात आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज सकाळी धारावीत नवे 6 रुग्ण आढळले आहे. 4 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या नवीन रुग्णासह धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता  55 वर पोहोचली आहे. संबंधित - मुंबईतील कूपर रुग्णालयात नर्सला जबर मारहाण, रुग्णाकडून विवस्त्र करण्याचा प्रयत्न CM उद्धव ठाकरे 8 वाजता संवाद साधणार, मजुरांच्या प्रश्नावरून केंद्राशी वाद
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या