मुंबईकरांनो सावधान! कोरोना अधिकारी असल्याचं सांगून केली मोठी फसवणूक

मुंबईकरांनो सावधान! कोरोना अधिकारी असल्याचं सांगून केली मोठी फसवणूक

हा प्रकार समोर येताच पोलिसांनी खोट्या कोविड अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 5 जुलै : राजधानी मुंबईसह राज्यभरात कोरोनाचं संकट अधिकच गडद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व यंत्रणा मोठ्या हिंमतीने लढा देत आहे. मात्र अशातच मुंबईत एक खळबळजनक घटना घडली असून कोरोना अधिकारी असल्याचं सांगून लूट केल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबईतील चेंबूर इथं कोरोना अधिकारी असल्याचं सांगून एका व्यक्तीला 54 हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. हा प्रकार समोर येताच पोलिसांनी खोट्या कोविड अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

30 जून रोजी फिर्यादी अब्दुल याकूब शेख, वय- 49 वर्षे हा सरस्वती विद्यालयासमोरुन चेंबूर स्टेशनकडे जात असताना दोन अनोळखी इसमांनी संगनमत करून ते कोरोना अधिकारी असल्याची बतावणी केली. त्यानंतर अब्दुल शेख यांची कागदपत्रांची बॅग तपासून त्यामध्ये असणारे कॅनरा बँकेचे एटीएम व त्याचा पिन नंबर हातचलखीने घेऊन एटीएमने त्यांच्या खात्यातील 54 हजार रुपये काढून फसवणूक केली.

हेही वाचा - दिग्दर्शक प्रविण तरडे यांची मोठी घोषणा, नव्या सिनेमाचं नाव केलं जाहीर

फसवणूक झाल्याचं लक्षात येताच अब्दुल शेख यांनी पोलीस स्थानकाकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ह फुटेज तपासून गुन्ह्यात वापरलेली मोटारकार होंडा सिटी MH 04CM7200 ही निष्पन्न करून गाडी मालकाकडे तपास केली. त्यानंतर आरोपी सोहन गणेश वाघमारे यास अटक करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्याचा साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: July 5, 2020, 10:30 PM IST

ताज्या बातम्या