मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai मध्ये कोरोनाने वाढवली चिंता; BMC ने केल्या 13 इमारती सील

Mumbai मध्ये कोरोनाने वाढवली चिंता; BMC ने केल्या 13 इमारती सील

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

mumbai coronavirus news updates : मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.

  मुंबई, 21 नोव्हेंबर : महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात आता कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येत कमी येताना दिसत आहे. मात्र, असे असतानाच आता मुंबईतून (Mumbai) एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. शनिवारी कोरोना बाधितांच्या संख्येमुळे मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील 13 इमारती सील (BMC sealed 13 buildings) केल्या आहेत. जर इमारती सील केल्या नाही तर कोरोना बाधितांची संख्या आणखी झपाट्याने वाढू शकते त्यामुळे बीएमसी अधिकाऱ्यांनी या 13 इमारती सील करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी मुंबईत 195 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

  20 नोव्हेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार, मुंबईत 195 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर 351 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्याचवेळी एका कोरोना बाधिताचा शनिवारी मृत्यू झाला. मुंबईतील रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्के इतका आहे. तर 13 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.03 टक्के इतका होता. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 2308 दिवस इतका आहे.

  वाचा : कोरोनाशी लढाई अखेर जिंकलीच! तब्बल 202 दिवस रुग्णालयात उपचार घेऊन ती परतली घरी

  कुठल्या भागात कोविड रुग्णांची नोंद?

  मुंबई महानगरपालिकेच्या मते सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातील आहेत. अंधेरी पश्चिम येते 314 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर वांदेर परिसरात 214 सक्रिय रुग्ण आहेत. अंधेरी पूर्व परिसरात 196 सक्रिय रुग्ण आहेत आणि बोरिवली येथे 191 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या मुंबईत एकूण 20 इमारती सील आहेत. बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मात्र, नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

  राज्यातील कोरोनाची स्थिती

  महाराष्ट्रात शनिवारी एकूण 833 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 15 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 66,29,577 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 2271 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 64,74,952 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्यस्थिती राज्यात एकूण 10,249 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.67 टक्के इतका आहे. तर मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे.

  वाचा : कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये वाढतोय मानसिक आजाराचा धोका, संशोधनातून माहिती समोर

  वाढत्या रुग्णसंख्येने वाढवली चिंता

  राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण आणि त्यासोबतच लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने सरकारने सर्व सेवा, व्यवहार सुरू केले. शाळा, महाविद्यालये, मंदिरे, मॉल्स, चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, आता दिवाळीनंतर मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे चिंता वाढली आहे.

  First published:

  Tags: BMC, Coronavirus, Mumbai, महाराष्ट्र