बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संभाव्य आंदोलनात भाजपनेही घेतली उडी

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संभाव्य आंदोलनात भाजपनेही घेतली उडी

भाजपनंही यात उडी घेत बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 मे : बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी सोमवारपासून घरी थांबावं, असं आवाहन बेस्ट वर्कर्स युनियनने केल्यानंतर आता भाजपनंही यात उडी घेत बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी “बेस्ट कर्मचा-यांच्या जीवताच्या रक्षणाची हमी महापालिकेने घ्यायलाच हवी, त्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा मानवतेच्या भावनेतून आम्हालाही त्यांच्या आंदोलनात उतरावं लागेल” असं म्हटलं आहे. त्यामुळे या मागण्यांवरुन आता राजकारण सुरू झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असल्याने भाजपनेही या विषयात आपला रस दाखवला आहे. याआधी बेस्ट वर्कर्स युनियनच्या शशांक राव यांनी सोमवारपासून बेस्टच्या कर्मचा-यांनी घरी थांबण्याचं आवाहन केलं. त्यावर कोरोनाचं संकट असताना केलेल्या या आवाहनावरुन त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

काय आहेत मागण्या?

बेस्ट कर्मचारी करोनाबाधित झाल्यावर त्याचं आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांचं विलगीकरण करण्यात यावं, प्रत्येक आगारात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून प्रत्येक बेस्ट कामगारांची करोना चाचणी रोज करण्यात यावी, बेस्ट कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी राखीव व स्वतंत्र बसगाड्या सुरू कराव्यात, करोनाबाधित मात्र कोरोनाचे लक्षण नसलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात यावे आणि तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, करोनाच्या विरोधात लढण्यासाठी कर्तव्यावर उपस्थित असलेले आणि करोनाबाधित होऊन मृत्यूमुखी पडलेले बेस्ट, पालिका व अन्य आस्थापनातील, पोलीस कर्मचारी यांना शहीद दर्जा देऊन इतर सर्व सवलती त्यांना देण्यात याव्यात, अशा अनेक मागण्या बेस्ट उपक्रमाकडे करण्यात आल्या आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 16, 2020, 2:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading