मुंबईत कोरोनाचा धुमाकूळ सुरू असतानाच BMC जारी केलं नवं परिपत्रक

मुंबईत कोरोनाचा धुमाकूळ सुरू असतानाच BMC जारी केलं नवं परिपत्रक

Mumbai Coronavirus : केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मुंबई महापालिकेला कळवल्याशिवाय कुठेही कोरोना रुग्णांना भरती केले जाऊ नये, अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च : कोरोना रुग्णांवरील (Corona Patients) उपचारासंदर्भात मुंबई महापालिकेकडून (BMC) रुग्णालयांसाठी नवे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. अनेक खासगी रुग्णालये रुग्णांना थेट अ‍ॅडमिशन देत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मुंबई महापालिकेला कळवल्याशिवाय कुठेही कोरोना रुग्णांना भरती केले जाऊ नये, अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

खासगी रुग्णालये, नर्सिंग होम यांनी रुग्णांना दाखल करत असताना महापालिकेच्या वॉर रूमला त्याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. कुठल्याही कोरोना रुग्णांना भरती करत असताना केंद्र शासनाने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार घरी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जावी. मुंबई महापालिका हद्दीतील सर्व रुग्णालये हे कोव्हिड रुग्णांकडून ठरवून दिलेल्या दराप्रमाणे बिल आकारणी करत आहेत अथवा नाही याची पाहणी महापालिकेच्या नियमकांनी तात्काळ सुरू करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई शहरातील सर्वच कोव्हिड सेंटर्सचे तात्काळ फायर ऑडिट सुरु करण्यात येत आहे. तसंच मुंबई महापालिकेच्या वतीने तात्काळ 2269 बेड खासगी रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यात 360 आयसीयू बेड्सचा समावेश आहे.

हेही वाचा - कोरोनाचा शरीराप्रमाणे मनावरही झाला परिणाम; सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुण्यातील संशोधकांनी दाखवली दुसरी बाजू

दरम्यान, मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात बांद्रा पश्चिम कोरोनाचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे. म्हणजेच कोरोनाच्या रुग्णवाढीचा येथे उद्रेक होत आहे. त्या खालोखाल गोरेगाव, चेंबूर पश्चिम, अंधेरी पश्चिम, आणि अंधेरी पूर्व अशी ही 5 महत्वाची, अतिसंसर्गाची आणि पटापट रुग्णवाढीची ही ठिकाण आहेत. एका आठवड्यात जवळपास 1500 ते 2300 इतके रुग्ण या प्रभागात वाढले आहेत. याचाच अर्थ असा की, सगळ्यात जास्त लागण याचं पाच प्रभागात होते. त्यामुळे या परिसरातील कोरोना रुग्णवाढ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 30, 2021, 11:35 AM IST

ताज्या बातम्या