धारावी नव्हे तर मुंबईतील हे सात वॉर्ड आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

धारावी नव्हे तर मुंबईतील हे सात वॉर्ड आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

एकिकडे धारावीत कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे, तर दुसरीकडे आता मुंबईतल्या (mumbai coronavirus) इतर ठिकाणी कोरोना थैमान घालू लागला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जून : मुंबईतील कोरोनाव्हायरसची (mumbai coronavirus) आकडेवारी पाहता एकिकडे सर्वात आधी कोरोनाचा हॉटस्पॉट राहिलेल्या धारावीकडून दिलासा मिळतो आहे, तर दुसरीकडे मात्र कोरोनाचे नवे हॉटस्पॉट (mumbai corona hotspot) तयार होऊ लागलीत. मुंबईत आता धारावी नवे तर इतर सात वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट झालेत आणि हे हॉटस्पॉट मुंबईच्या उपगनरातील आहेत.

दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, भांडुप, मुलुंड हे कोरोनाव्हायरसचे हॉटस्पॉट झालेत. इथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

या नवीन हॉटस्पॉटमध्ये आता रॅपिड अकॅशन प्लॅन पूर्णपणे लागू केला जाणार आहे. म्हणजेच मिशन झिरो याअंतर्गत इथे नवीन रुग्ण निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी 50 फिरते दवाखाने या वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांची तपासणी करणार आहेत.

उच्चभ्रू वस्तीतही कोरोनाचा हाहाकार

फक्त झोपडपट्टी परिसरच नव्हे तर उच्चभ्रू वस्तीतील मोठ्या इमारतींमध्ये कोरोनाचा फैलाव होतो आहे. नेपीएसी रोडवरील तानही हाइट्स इमारतीत 21 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. या इमारतीच्या सर्व रहिवाशांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर जवळील सुभाष बिल्डिंगलाही क्वारंटाइन केलं गलं आहे. या इमारतीतह काही कोरोना रुग्ण आहेत.

हे वाचा - बापरे! मुंबईत पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार, आयुक्तांनी दिला इशारा

परिसरातील फेरिवाल्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय मोलकरीण आणि ड्रायव्हर्सनाही बंदी घालण्यात आली आहे.

धारावीत मात्र रुग्णसंख्या लक्षणीय प्रमाणात कमी झाली आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार धारावीत एकूण 2170 कोरोना रुग्ण आहेत. दिवसभरात कोरोनाचे फक्त 12 रुग्ण आढळून आलेत. तर दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कोरोना हॉटस्पॉत ते मॉडेल बनवण्याच्या मार्गावर धारावी आहे.

हे वाचा - राज्यपालांना पटला अमित ठाकरेंचा मुद्दा, दिले 'हे' आश्वासन

महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. आता पावसाळा लागल्याने सरकारची चिंता वाढली आहे. त्यासाठी महापालिकेने एक Rapid Action Plan तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोनाचे रूग्ण वाढण्याची शक्यता असून त्यासाठी तयारी सुरू केल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता एकूण 132075 कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 60147 सक्रिय रुग्ण आहेत. तर 65744 रुग्ण बरे झालेत त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. रविवारी 3870 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1591 रुग्ण बरे झाले.

संपादन - प्रिया लाड

First published: June 22, 2020, 4:11 PM IST

ताज्या बातम्या