Home /News /mumbai /

कोरोना रुग्ण वाऱ्यावर तर कर्मचारी आंदोलनावर, मुंबईतल्या केईएममधला धक्कादायक प्रकार

कोरोना रुग्ण वाऱ्यावर तर कर्मचारी आंदोलनावर, मुंबईतल्या केईएममधला धक्कादायक प्रकार

खरंतर केईएममध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या आहे. त्यामुळे कामगारांच्या अशा आंदोलनामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

मुंबई, 26 मे : राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात मुंबईच्या केईएम रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी कर्मचारी काम करत नाहीत, फुकटचा पगार घेतात, त्यांना कामावरून काढून टाकलं पाहिजे असा वक्तव्य केलं असल्याचं कामगारांचा आरोप आहे. त्यावरून त्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं असल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठांनी केलेल्या वक्तव्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे. कालच या रुग्णालयात रोजदारी काम करणाऱ्या एका 32 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. प्रशासन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याचही कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास या कामगारांनी आंदोलनासाठी सुरूवात केली. खरंतर केईएममध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या आहे. त्यामुळे कामगारांच्या अशा आंदोलनामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोरोनासारख्या संसर्गाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश घरात बसला असला तरी अत्यावश्यक सेवा आपला जीव घोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या आरोग्याचादेखील विचार करणं महत्त्वाचं आहे. केईएममधील बऱ्याच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांनाही कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे. सोमवारी केईएम रुग्णालयातील शवगृहातील 3 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या शवगृहातील 3 कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या विभागात एकूण 27 कर्मचारी काम करतात आणि त्यापैकी 3 जण आता रुग्णालयात दाखल झाले आहे. कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे कर्मचारी कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती आहे. धक्कादायक म्हणजे, शवागृहातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली हे स्पष्ट झाल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांची अजूनही तपासणी झालेली नाही. त्या कर्मचाऱ्याचे स्वॅबचे रिपोर्ट घेण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळचं वातावरण निर्माण झालं आहे. संकलन आणि संपादन - रेणुका धायबर कोरोना  लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं
Published by:Manoj Khandekar
First published:

पुढील बातम्या