कोरोनाची लागण झाल्याची माहिती लपवली, गरोदर महिलेमुळे डॉक्टरांनाही लागण

कोरोनाची लागण झाल्याची माहिती लपवली, गरोदर महिलेमुळे डॉक्टरांनाही लागण

'पत्नीची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे तिला कोविड रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले होते. पण, जर कोविड रुग्णालयात दाखल केले असते तर बाळाचा जन्म हा तिथेच झाला असता'

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : कोरोनाची लागण (Corona Positive) झालेली असतानाही गरोदर महिलेला (Pregnant women) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, कोरोनाची लागण झाली असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून डॉक्टरांनी (Doctor) गरोदर महिलेची यशस्वी प्रसूती केली. पण, आता डॉक्टारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही घटना मुंबईतील मालाड भागात घडली.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 22 ऑक्टोबर रोजी हे दाम्पत्य लाइफवेव्ह हॉस्पिटलमध्ये (Lifewave Hospital) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दाखल झाले होते. या महिलेला तातडीने प्रसूती वार्डात हलवण्यात आले होते. डॉ. चार्मी देशमुख (Dr. charmi Deshmukh) यांनी गरोदर महिलेला 'कोविडची चाचणी केली आहे का?', अशी विचारणा केली होती. पण, या महिलेनं कोरोनाची चाचणी करण्यास नकार दिला.  त्यानंतर डॉ. देशमुख यांनी नियमांप्रमाणे या महिलेची कोविड-19 ची चाचणी केली. त्यानंतर आलेल्या रिपोर्टमध्ये या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

बाजारभावापेक्षा 15% कमी किंमतीत मिळतं 'या' 5 शहरात सोनं, एका तोळ्याचा असा आहे दर

अखेर या महिलेच्या पतीने दया-याचना करण्यास सुरुवात केली. आपल्या पत्नीची कोविड चाचणीही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या आधी आठच्या सुमारास पॉझिटिव्ह आली होती, अशी कबुली महिलेच्या पतीने दिली. पत्नीची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे तिला कोविड रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले होते. पण, जर कोविड रुग्णालयात दाखल केले असते तर बाळाचा जन्म हा तिथेच झाला असता. त्यामुळे आम्ही खोटं बोललो, असंही पतीने सांगितले.

परंतु, महिलेची प्रसूतीची वेळ जवळ आल्यामुळे लाइफवेव्ह हॉस्पिटलच्या प्रशासनाने तात्काळ तिला मालाड येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलवले. त्याच दिवशी या महिलेनं एका बाळाला जन्म दिला. डॉ. देशमुख यांच्या टीमने जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती केली.

बाप रे! तोंडातून शिकार सुटली अन् बिबट्यानं गेटवरून मारली उडी, पाहा थरारक VIDEO

पण, चार दिवसांनी डॉ. देशमुख यांना ताप आला, त्यामुळे तातडीने त्यांची कोविड चाचणी करण्यात आली असता रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला. पहिल्या आठवड्यात त्यांची प्रकृती खालावली आणि ऑक्सिजनची पातळीही कमी झाली. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. दरम्यान, डॉ. देशमुख यांच्या आठ वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Published by: sachin Salve
First published: October 26, 2020, 10:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading