मुंबई, 27 जुलै : राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढला आहे. कोरोनाच्या या संसर्गामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पूर्व भागात रुग्णांचा आकडा 7 हजारांच्या पार गेला आहे.
अंधेरी पूर्व हा मुंबईतला पहिला वॉर्ड आहे जिथे रुग्णांच्या आकडेवारीने 7 हजार बाधितांचा टप्पा पार केला आहे. परिसरात एकूण रुग्ण 7055 झाले आहेत. अंधेरी पूर्वेत मृत्यूही सर्वाधिक 442 आहेत. तर 6 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या वॉर्डांची संख्या मुंबईत 5 झाली आहे. मुंबईत आज 1101 रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 109161 झाली आहे.
संतापजन! अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या, रायगड हादरलं
राज्याचा सध्या मृत्युदर 3.63 टक्के एवढा आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 56. 74 टक्के एवढे झाले आहे. तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज 286 नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 17738 एवढी झाली.
महाराष्ट्राच्या जवानाचा कोरोनाने मृत्यू, कुटुंबाने VIDEO कॉलवर घेतलं अंत्यदर्शन
पुणे विभागातील 48 हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 84 हजार 455 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 33 हजार 649 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 921 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.37 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.