कोरोनायोद्ध्यांचा मोडून पडला संसार, रात्री पत्नीचा मृत्यू तर सकाळी पतीने घेतला अखेरचा श्वास

कोरोनायोद्ध्यांचा मोडून पडला संसार, रात्री पत्नीचा मृत्यू तर सकाळी पतीने घेतला अखेरचा श्वास

नायर रुग्णालयातील लॅबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या आणि त्याच्या पत्नीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मे : मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजूनही वाढतच असल्याचं चित्र आहे. या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि प्रशासनातील इतर घटक युद्ध पातळीवर काम करत आहेत. मात्र हे कर्तव्य पार पाडत असताना काही कोरोनायोद्ध्यांनाही या रोगाची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच नायर रुग्णालयातील लॅबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या आणि त्यांच्या पत्नीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबत नायर हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाची बाधा झाल्यामुळे नायर मधील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर आदल्याच रात्री त्यांच्या पत्नीचाही कोरोनानेच बळी घेतला होता. 24 तासाच्या आत पती पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे यापुढे कोरोनाला हरवण्यासाठी मोठी मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्याची अजून मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागणार आहे, हेच अधोरेखित होतं.

दुसरीकडे, मुंबई पोलीस दलातील आणखी एका जवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 52 वर्षीय दिपक हाटे नावाच्या पोलीस हवालदाराचा 10 दिवस उचपार घेतल्यानंतर घरी सोडल्यावर घरात मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ते बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते.

मुंबईवर आणखी एक संकट

कोरोनाव्हायरस (Coronavirus) संक्रमणाने त्रस्त असलेल्या मुंबईला (Mumbai) आता आणखी एका संकटाला सामोर जावं लागणार आहे. पुढील आठवड्यात मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे. मुंबईत मान्सून सहसा जूनच्या दुसर्‍या आठवड्यात बरसतो पण हवामानातील बदलामुळे पुढच्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. कोरोनामुळे पावसाळ्यापूर्वी तयारी झाली नाही. त्यात मुंबईतरल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आता मुंबईकरांना दुहेरी संकटाला सामोरं जावं लागणार आहे.

First published: May 30, 2020, 5:51 PM IST

ताज्या बातम्या