BREAKING: मुंबईत 22 वर्षीय तरुणीसह आणखी एका महिलेला कोरोनाची लागण, राज्यात आकडा 49वर

BREAKING: मुंबईत 22 वर्षीय तरुणीसह आणखी एका महिलेला कोरोनाची लागण, राज्यात आकडा 49वर

एका 22 वर्षीय तरुणी तर एका 49 वर्षीय महिलेला मुंबईमध्ये कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : राज्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण सापडले आहे. मुंबईमध्ये दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एका 22 वर्षीय तरुणी तर एका 49 वर्षीय महिलेला मुंबईमध्ये कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 49र पोहोचली आहे. अशात सुरक्षा म्हणून राज्यात सगळ्यात महत्त्वाच्या शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना झालेल्या 22 वर्षीय तरुणीचा युरोप प्रवासाचा इतिहास आहे तर 49 वर्षीय महिलेचा दुबई प्रवासाचा इतिहास आहे. या दोघींना तात्काळ उपचारासाठी नेण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, काल मुंबईत एका 68 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे ही महिला कोणताही परदेश दौरा करुन आली नव्हती.

संबंधित - कोरोनासंदर्भात वुहानमध्ये गोड बातमी, 2 महिन्यानंतर पहिल्यांदाच घडला असा प्रकार

!function(e,i,n,s){var t="InfogramEmbeds",d=e.getElementsByTagName("script")[0];if(window[t]&&window[t].initialized)window[t].process&&window[t].process();else if(!e.getElementById(n)){var o=e.createElement("script");o.async=1,o.id=n,o.src="https://e.infogram.com/js/dist/embed-loader-min.js",d.parentNode.insertBefore(o,d)}}(document,0,"infogram-async");

आतापर्यंत नोंदविल्या गेलेल्या रुग्णांमध्ये अधिकांश हे परदेश दौरा करुन आलेले रुग्ण आहेत. मात्र मुंबईत आढळून आलेल्या या महिलेला कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या घरातून संसर्ग झाला आहे. ही महिला अमेरिकेतून आलेल्या व्यक्तीच्या घरात काम करत होती. यानंतर ती आणखी कोणाकडे काम करण्यासाठी गेली होती याचा तपास घेतला जाणार आहे. त्यातून संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून पुण्याला एका दाम्पत्याला घेऊन जाणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरला कोरोनाचा संसर्ग झाला होता.

हे वाचा - एकमेकांना मिठीत घेत गळ्यात बांधला फास, प्रेमी युगुलाने Live केली आत्महत्या

काल महाराष्ट्रात 4 कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची नोंद झाली आणि आता हा आकडा 49 पर्यंत पोहोचला आहे. काल पहिल्यांदा पुण्यातून एका पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर मुंबईतून 68 वर्षांची महिला, पिंपरी-चिंचवडमधील 21 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद करण्यात आली. रत्नागिरीतूनही 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधित (Covid - 19) रुग्णांची संख्या 49 वर गेली आहे.

First published: March 19, 2020, 10:25 AM IST

ताज्या बातम्या